वादळी वाऱ्याने कृष्णाई गोशाळेच्या शेडचे मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही...


 वादळी वाऱ्याने कृष्णाई गोशाळेच्या शेडचे मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही...

जळगाव जामोद(प्रतिनिधी):

जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथे काल संध्याकाळी आलेल्या तुफान वादळी वाऱ्यामुळे कृष्णाई गोशाळेच्या पत्र्याच्या शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, काल 1 जून रोजी सायंकाळी  6 च्या दरम्यान अचानक हवेचा वेग प्रचंड वाढला. सोसाट्याच्या वाऱ्याच्या तडाख्याने गोशाळेवरील संपूर्ण पत्र्याचे शेड उडून जमिनीवर कोसळले. लोखंडी अँगल वाकून शेडचा अक्षरशः चक्काचूर झाला. सुदैवाने यावेळी शेड जवळ कोणीही उपस्थित नसल्याने व गोधन दुसऱ्या बाजूला सुरक्षित स्थळी  असल्याने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.सर्व गाई-गुरे सुरक्षित आहेत.गोशाळेच्या व्यवस्थापनाने सांगितले की, "पावसाळ्यापूर्वीच हे मोठे संकट आले आहे. ऊन-पावसापासून गोधनाच्या संरक्षणासाठी शेडची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. अंदाजे 2 ते 3 लाखांचे नुकसान झाले आहे."

Previous Post Next Post