जळगाव जामोद(प्रतिनिधी):
स्वा.वि.ग.ई कृषी महाविद्यालयातील सातव्या सत्रातील विद्यार्थी यांनी ९ जुन २०२६ रोजी त्यांच्या कृषी कार्यानुभव कार्यक्रमाद्वारे तरोडा बु. येथील शेतकर्यां सोबत संवाद साधून माती परीक्षणा विषयी चारच्या केली व त्यांच्या जमिनीतील मातीचे नमूने घेतले. माती परीक्षणामुळे खताची मात्रा ठरवता येते. मातीतील घटकांची कमतरता माहिती होते. त्यानुसार मातीतील पोषकद्रव्येची उपाय योजना करता येते. तरोडा बु. येथील गावकरी व गावातील उपस्थित शेतकरी यांनी त्यांना सहकार्य केले . तसेच गावातील संरपंच सौ. फुलावती बाबुराव पवार यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . तसेच माती परिक्षणासाठी विद्यार्थ्यी संकेत महाले , कार्तिक ताथोड , आदित्य जळमकार , वेदांत कोलते , प्रथमेश मामनकार , ॠषीकेश नेमाडे , हर्षल खाडे, राहुल चौधरी, विशाल देशमुख, प्रतीक चंदणसे, माशीर शेख यांनी कार्यक्रम पार पाडला. तसेच कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश गवई सर, कार्यक्रमाचे अधिकारी अविनाश आटोले सर व समन्वयक प्रमोद ढवळे सर तसेच विषय तज्ञ विशाल बोरसे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
