विहिरीवरील ग्रील तोडून मोटार चोरी; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण...


 विहिरीवरील ग्रील तोडून मोटार चोरी; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण...

जळगाव जामोद (प्रतिनिधी):

जळगांव जामोद तालुक्यातील खेर्डा बु येथील शिवारात पुन्हा एकदा चोरट्यांनी चोरी करत शेतकऱ्यांना लक्ष्य केले आहे. प्रवीण महादेवराव भोपळे यांच्या गट नंबर ३६० मधील शेतातील विहिरीवरील लोखंडी ग्रील व कुलूप तोडून विहिरीत बसविण्यात आलेली पाण्याची मोटार अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना शुक्रवार दिनांक १७ जुलै २०२६ रोजी उघडकीस आली.मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत प्रथम विहिरीवरील मजबूत लोखंडी ग्रील व कुलूप तोडली आणि त्यानंतर विहिरीत बसवलेली मोटार चोरी करून नेली. सकाळी शेतात गेल्यानंतर ही बाब शेतकऱ्याच्या निदर्शनास आली. या प्रकारामुळे प्रवीण भोपळे यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.विशेष म्हणजे, यापूर्वीही याच शेतातून तीन वर्षाचा गोवंश (गोरा) चोरीला गेले होता. त्या घटनेचा तपास अद्याप पूर्ण न झाल्याने परिसरातील शेतकरी आधीच चिंतेत आहेत. आता पुन्हा मोटार चोरीची घटना घडल्याने चोरट्यांचे मनोबल वाढल्याची भावना व्यक्त होत आहे.खेर्डा बु शेतातील शेती उपयोगी साहित्य स्पिंकलर पाईप, स्पिंकलर नौजल, मोटरचे केबल चोरी जात आहेत या वाढत्या चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्री शेतातील साहित्य व जनावरांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरी पोलिस प्रशासनाकडे या प्रकरणाचा तातडीने तपास करून चोरट्यांना जेरबंद करण्याची आणि ग्रामीण भागात रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी करत आहेत.या घटनेमुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Previous Post Next Post