हिवरखेड येथे भव्य मुख्यमंत्री जन आरोग्य शिबीर संपन्न..700 पेक्षा जास्त रुग्णांची केली तपासणी


 हिवरखेड येथे भव्य मुख्यमंत्री जन आरोग्य शिबीर संपन्न..700 पेक्षा जास्त रुग्णांची केली तपासणी

अर्जुन खिरोडकार/हिवरखेड..

येथील संत तुकाराम महाराज प्रबोधन समिती व प्रयास फाउंडेशनच्या वतीने आरोग्य वर्धिनी केंद्र हिवरखेड येथे भव्य मुख्यमंत्री जन आरोग्य शिबीर संपन्न झाले. या शिबिरात अकोला येथील न्युरॉन हॉस्पिटलचे मेंदूविकार तज्ञ डॉ. नितीन विरवाणी,सोलर फ्लेक्स मल्टी स्पेशालिटि हॉस्पिटलचे बालरोग तज्ञ डॉ. कृष्णाकुमार केसान, गजानन हॉस्पिटल खडकी अकोल्याचे अस्थीरोग तज्ञ डॉ. अंकुश कराळे त्यांच्या पत्नी स्त्री रोग तज्ञ डॉ. प्रिती कराळे, मातोश्री मल्टी स्पेशालिटि हॉस्पिटल अकोटचे हृदयरोग तज्ञ डॉ अभिजित पुंडकर यांनी 700 पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले. संत तुकाराम महाराज प्रबोधन समिती व प्रयास फाउंडेशन द्वारा आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. सुलभाताई रमेशजी दुतोंडे होत्या तर प्रमुख उपस्थिती म्हणून उपाध्यक्षा सौ. प्रतिभाताई विरेंद्रजी येऊल, गट नेत्या सौ. वैशालीताई गणेशराव वानखडे, आरोग्य सभापती सौ. वंदनाताई राजेशजी वानखडे,महिला व बालकल्याण सभापती सौ. प्रमिलाताई रविंद्रजी मानकर, उपसभापती सौ. अनिताताई रविंद्रजी वाकोडे, बांधकाम सभापती वैभव रमेशजी गावंडे, पाणी पुरवठा सभापती अजीज खान, नगरसेवक दानिश खान, दिपक रायबोले, प्रथमेश नाठे,सामाजिक कार्यकर्ते नसिम खान, अब्दुल सलमान,आरोग्य वर्धिनी केंद्राच्या डॉ. ठाकरे मॅडम, डॉ. घुले मॅडम,शिबीर समन्वयक सुनिल सुरत्ने यांची उपस्थिती होती.यावेळी बोलतांना भाजपचे अकोट विधानसभा विस्तारक रमेशजी दुतोंडे यांनी आरोग्य शिबिराचे महत्व समजावून सांगत जनतेला आम्ही स्वच्छता, आरोग्याचे जे आश्वासन दिले होते हे शिबीर त्याचाच एक भाग असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर मंडळी व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र कराळे, प्रास्ताविक किरण सेदानी यांनी केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी सुदाम राऊत, वैभव पोटे, दानिश खान,प्रथमेश नाठे,संतोष कळसकार,यांनी परिश्रम घेतले. यावेळी बाळासाहेब भोपळे,अनिल कराळे, रमेश व्यवहारे, रामेश्वर शिंगणे,आनंद बोहरा,पोलीस पाटील प्रकाश गावंडे,संतोष शर्मा, संतोष राठी, विनोद ढबाले,प्रा. गौतम इंगळे,मनिष गोरद, राजेश टाले, नंदू शिंदपुरे,यांच्यासह पत्रकार बाळासाहेब नेरकर, केशव कोरडे इ. उपस्थित होते.

Previous Post Next Post