वसंतराव देशमुख इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे पूजन व सामूहिक वृक्षारोपण;'प्रवेशोत्सव' उत्साहात संपन्न!


 वसंतराव देशमुख इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे पूजन व सामूहिक वृक्षारोपण;'प्रवेशोत्सव' उत्साहात संपन्न!

अर्जुन खिरोडकार/हिवरखेड (प्रतिनिधी)

येथील आकांक्षा शिक्षण संस्था हिवरखेड द्वारा संचलित वसंतराव देशमुख इंटरनॅशनल स्कूल येथे प्री-स्कूलच्या (पूर्व प्राथमिक) चिमुकल्या विद्यार्थ्यांचा शालेय प्रवेशोत्सव अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि स्तुत्य उपक्रमाने साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृतीचे जतन करत या प्रसंगी शाळेत पहिल्यांदा पाऊल टाकणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांचे पाय धुवून व रीतसर पूजन करण्यात आले. तसेच चिमुकल्यांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी त्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांच्या शैक्षणिक जीवनाची गोड सुरुवात करण्यात आली. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे पर्यावरणाप्रती कृतज्ञता व्यक्त करत सामाजिक वनीकरण विभाग तेल्हारा यांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेला भव्य सामूहिक वृक्षारोपण कार्यक्रम होय. या प्रसंगी विद्यार्थी, पालक, प्रतिष्ठित नागरिक आणि युवक वर्गाच्या उत्स्फूर्त लोकसहभागातून शालेय परिसरात एकाच वेळी सामूहिक वृक्षांची लागवड करून नवा आदर्श निर्माण करण्यात आला.

प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या मुख्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिवरखेड केंद्राचे केंद्रप्रमुख गजानन राऊत उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक वनीकरण विभाग तेल्हाराचे वनपाल शिवदास मुंढे सर आणि वनरक्षक विनोद पराते यांची उपस्थिती लाभली होती.  यासोबतच परिसरातील प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी व नागरिकांमध्ये किरण सेदानी नगरसेवक नगरपरिषद हिवरखेड, सेवा सहकारी सोसायटीचे संचालक रवींद्र मानकर, तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सुनील इंगळे, राजेश वानखडे सर, पालक प्रतिनिधी किशोर मसूरकर, आणि सामाजिक कार्यकर्ते संतोषजी शर्मा प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच महसूल विभागाचे भूषण दाळू व मंगेश गिल्ले, पंकज अग्रवाल, रामकृष्ण भड, डॉ. आशिष कतोरे, डॉ. बहाकर, डॉ. मुरकर, मुन्ना भाऊ राऊत, श्याम टावरी, अक्षय सोनवणे, पद्माकर महल्ले, अमोल तळोकार, प्रा निलेश गिर्हे, अभिजीत भोपळे, डॉ. शंकर दुनघव, प्रा ज्ञानेश्वर अवचार, प्रवीण सोनवणे, निलेश कासोटे, सुनील वाकोडे, आणि धारपवार सर सर्व विद्यार्थ्यांचे पालक माता भगिनी यांनी उपस्थित राहून या सामूहिक वृक्षारोपण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आकांक्षा शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. मयूर बंडू लहाने यांनी चिमुकल्यांच्या शालेय जीवनाची सुरुवात सुसंस्कार आणि पर्यावरणाच्या रक्षणाने करण्यामागची भूमिका विशद केली. वृक्षांचे जतन हेच मानवाचे भविष्य असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन लहाने मॅडम यांनी केले. हा अभिनव आणि भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या व संस्थेच्या सर्वच घटकांनी अहोरात्र परिश्रम घेतले. यामध्ये प्रामुख्याने अरुणा राघवरते, कैलास बेदुरकार, मयुरी काईगे, मुस्कान सबा, माधुरी काळे, सरिता काळे, ज्ञानेश्वर धर्माळे, प्रसाद देशमुख, तुषार रहाणे, यश परनाटे, रोहित बहाकर, आकाश बामणे, फैजल शेख, तन्मय मंडेवाले, ओम राजनकर, सुयश दवे, शितल राठोड, रोहन कानतोडे, शैलेश भड, राजनकर मॅडम यांनी विशेष योगदान दिले. यासोबतच आकांक्षा ग्रामसंघाचे पदाधिकारी, आकांक्षा युवक मंडळाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच आकांक्षा कॉलेज ऑफ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची यशस्वी सांगता केली. विद्यार्थ्यांचे पूजन आणि सामूहिक वृक्षारोपणाच्या या अनोख्या उपक्रमाचे हिवरखेड परिसरात सर्व स्तरांतून भरभरून कौतुक होत आहे.

Previous Post Next Post