जळगाव जामोद(प्रतिनिधी):
'विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-२०२६' अंतर्गत जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील ४ मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (BLO) अत्यंत तत्परतेने आणि यशस्वीरीत्या आपले काम पूर्ण करून आदर्श निर्माण केला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी शैलेश काळे यांच्या हस्ते आज १३ जुलै २०२६ रोजी या अधिकाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत BLO आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक कुटुंबाला भेट देऊन मतदार पडताळणी, माहिती संकलन आणि आवश्यक नमुने भरून घेण्याचे काम करत आहेत. हे काम पूर्ण करण्यासाठी ३० जून २०२६ ते २९ जुलै २०२६ पर्यंतची मुदत देण्यात आली होती.निर्धारित वेळेच्या खूप आधी, केवळ १३ दिवसांच्या कालावधीत १०० टक्के इन्युमरेशन फॉर्म्सचे डिजिटायझेशन पूर्ण करणाऱ्या मध्ये सुनीता विजय मोरे (अंगणवाडी सेविका, यादी भाग क्रमांक २२२, कळमखेड).सपना दिनेश ससाणे (आशा वर्कर, यादी भाग क्रमांक २११, आडोळ बु.). सुनीता परमेश्वर वानखडे (अंगणवाडी सेविका, यादी भाग क्रमांक १२६, वडगाव पाटन).वैभव ज्ञानेश्वर चव्हाण (सहा. शिक्षक, यादी भाग क्रमांक ५, भिंगारा).या यशाबद्दल अभिनंदन करताना, मतदार नोंदणी अधिकारी शैलेश काळे यांनी इतर BLO ला या अधिकाऱ्यांचा आदर्श घेऊन आपले काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, नागरिकांनी या कामात सहकार्य करून अधिकारी विचारतील ती आवश्यक माहिती अचूक उपलब्ध करून द्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.यावेळी तहसीलदार पवन पाटील, नायब तहसीलदार भरत किटे,सत्यविजय सातव यांचेसह निवडणूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
