सहकार विद्या मंदिर, पिंपळगाव काळेचा नूतन वास्तूत शुभारंभ..उत्साह, आनंद आणि नवचैतन्याच्या वातावरणात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाची मंगल सुरुवात..!


 सहकार विद्या मंदिर, पिंपळगाव काळेचा नूतन वास्तूत शुभारंभ..उत्साह, आनंद आणि नवचैतन्याच्या वातावरणात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाची मंगल सुरुवात..!

जळगाव जामोद(प्रतिनिधी):

शिक्षण, संस्कार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा नवा अध्याय सुरू करणाऱ्या सहकार विद्या मंदिर, पिंपळगाव काळेच्या नव्या शाळा वास्तूचे उद्घाटन तसेच नवीन शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस अत्यंत उत्साहपूर्ण, मंगलमय आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, पालकांचा विश्वास आणि शिक्षकांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसर नवचैतन्याने भारावून गेला !लेझीम च्या तालात मान्यवरांचे आगमन होऊन कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते फीत कापून नव्या शाळा वास्तूचे उद्घाटनाने करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. ज्ञान, संस्कार आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देत विद्यार्थ्यांच्या नव्या शैक्षणिक प्रवासाची मंगल सुरुवात करण्यात आली ! कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार विद्या मंदिरचे अध्यक्ष तथा बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. किशोर केला हे विराजमान होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांनी शिस्त, प्रामाणिकपणा आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांच्या बळावर यश संपादन करावे, असे आवाहन केले. भारतीय संस्कृतीवर आधारित , इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणासोबतच  आधुनिक , तंत्रस्नेही शिक्षण ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.यावेळी सहकार विद्या मंदिर, जळगाव जामोद, वरवट बकाल, दानापूर व पिंपळगाव काळे यांच्या मुख्य संयोजिका आदरणीय डॉ. स्वाती केला यांची विशेष उपस्थिती लाभली. आपल्या प्रस्तावनेतून शाळेतील नवीन शैक्षणिक धोरणानुसार, प्रत्यक्ष कृतीतून घेण्यात येणाऱ्या ज्ञानरचनावादी शिक्षणपद्धतीचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांविषयीची आत्मीयता, शिक्षकांना मिळणारे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि गुणवत्तापूर्ण , आधुनिक तंत्रज्ञानासहित शिक्षणाचा आग्रह हेच संस्थेचे वैशिष्ट्य असल्याचे प्रतिपादन केले. 

याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील, भाजप तालुकाध्यक्ष संजूभाऊ पांडव तसेच सागर मधुकर पांडव, डॉ. सागर टावरी,सागर भैय्या, राजेश काळे, डॉ. प्रशांत राजपूत आणि स्थानिक संचालक बुलडाणा अर्बन जळगांव जामोद बाबुभाई जमदार,सरोजदेवी किसनलालजी केला सहकार विद्या मंदिर, जळगाव जामोदचे प्राचार्य आदरणीय विनायक उमाळे, सहकार विद्या मंदिर ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य आदरणीय विनोद ईश्वरे, सहकार विद्या मंदिर, वरवट बकालचे प्राचार्य आदरणीय राजेश लोहिया, सहकार विद्या मंदिर, पिंपळगाव काळेच्या पर्यवेक्षिका कु. वैष्णवी चतारे, बुलढाणा अर्बन सोसायटी पिंपळगाव काळे शाखेचे शाखा व्यवस्थापक विजय मानकर, यांची प्रमुख उपस्थिती लाभली.मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत नियमित अभ्यास, वाचनाची सवय, शिस्त, संस्कार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडविण्याचा संदेश दिला. नव्याने उभारण्यात आलेली ही शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.नवीन वास्तूमध्ये प्रवेश करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, कुतूहल आणि आत्मविश्वास सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. शिक्षक, पालक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी नव्या उत्साहाने आपल्या शैक्षणिक वाटचालीची सुरुवात केली.कार्यक्रमात सातव मॅडम यांनी सुमधुर शारदा स्तवन सादर करून वातावरण भक्तिमय केले, तर भोजने मॅडम यांनी राष्ट्रगीत सादर करून कार्यक्रमाला प्रेरणादायी सुरुवात करून दिली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन कु. वैष्णवी चतारे यांनी केले, तर ताठे मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले.कार्यक्रमाचे नियोजन, आयोजन आणि व्यवस्थापन अत्यंत सुबक, शिस्तबद्ध व आकर्षक पद्धतीने पार पडले. उपस्थित पालक, ग्रामस्थ आणि मान्यवरांनी संस्थेच्या या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक करत नूतन वास्तूचे व आधुनिक शैक्षणिक वातावरणाचे भरभरून स्वागत केले.नूतन वास्तूमधील हा शुभारंभ सहकार विद्या मंदिर, पिंपळगाव काळेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद टप्पा ठरला आहे. ज्ञान, संस्कार, गुणवत्ता आणि आधुनिक शिक्षणाच्या बळावर विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्याचा संस्थेचा संकल्प यापुढेही अधिक जोमाने सुरू राहील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.या प्रसंगी धूत सर, घुटे सर, पाचडे मॅडम, अवचार मॅडम, बोदडे मॅडम, बागडे मॅडम तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post