अमरावती इर्विन रुग्णालयातील पार्किंग शुल्कावरून आर्थिक लूट?नागरिकांकडून चौकशीची मागणी...



अमरावती इर्विन रुग्णालयातील पार्किंग शुल्कावरून आर्थिक लूट?नागरिकांकडून चौकशीची मागणी...

राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

-अमरावती येथील इर्विन जिल्हा शासकीय रुग्णालयात पार्किंगच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. तसेच, पार्किंग शुल्क न भरल्यास काही पार्किंग कर्मचाऱ्यांकडून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी उद्धट व दादागिरीची वागणूक दिली जात असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे.

उपचारासाठी रुग्णालयात येणारे अनेक रुग्ण हे गरीब व गरजू कुटुंबातील असतात. अशा परिस्थितीत उपचारांच्या तणावात असलेल्या नागरिकांकडून अवाजवी शुल्क आकारणे किंवा त्यांच्याशी अयोग्य वर्तन करणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे.या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच, रुग्णालयातील पार्किंग व्यवस्थेत पारदर्शकता आणून शासनाने निश्चित केलेल्या नियमांनुसारच शुल्क आकारले जावे, अशी मागणी करण्यात येत आहे.याबाबत जय आदिवासी युवा शक्ती (JAYS), अमरावती ग्रामीणचे अध्यक्ष राहुल भुसुम यांनी या प्रकाराचा जाहीर निषेध व्यक्त केला असून, अमरावतीचे पालकमंत्री तसेच महाराष्ट्र शासनाने या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष देऊन सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.

___________________________________

"रुग्णालय हे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारे ठिकाण आहे. तेथे आर्थिक शोषण किंवा दादागिरीला कोणतीही जागा नसावी. प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी..

-राहुल भुसुम -अमरावती ग्रामीण जिल्हा अध्यक्ष*(जय आदिवासी युवा शक्ति (JAYS )

Previous Post Next Post