दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीचार्जचा निषेध: उद्या २३ जुलै रोजी जळगाव जामोद शहर व तालुका कडकडीत बंद..!


दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीचार्जचा निषेध: उद्या २३ जुलै रोजी जळगाव जामोद शहर व तालुका कडकडीत बंद..!

जळगाव जामोद (प्रतिनिधी)

दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर नीट (NEET) पेपर फुटीविरोधात २० जुलै २०२६ रोजी संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांनी लोकतांत्रिक आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन केले होते. मात्र, हे आंदोलन हाणून पाडण्यासाठी सरकारने पोलिसांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना जखमी करत अमानुष लाठीचार्ज आणि मारहाण केली.या विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या दडपशाहीचा आणि अमानुष लाठीचार्जचा तीव्र निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी २३ जुलै २०२६ रोजी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. या आवाहनाला साथ देत वंचित बहुजन आघाडी, समविचारी पक्ष, विविध संघटना तसेच विद्यार्थी संघटना जळगाव जामोद यांच्या वतीने उद्या २३ जुलै २०२६ रोजी जळगाव जामोद शहर व तालुका कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे.या बंद दरम्यान बस प्रवासी वाहतूक, व्यापारी व व्यावसायिकांची दुकाने एक दिवस पूर्णतः बंद ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये व शांतता-सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी प्रशासनाला योग्य तो पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.या निवेदनावर देवा दामोदर (तालुका अध्यक्ष, वं.ब.आ.), सुनील बोदडे, ॲड. संदिप उगले, प्रा. विजय सातव, आजम कुरेशी, उत्तम वानखडे, श्रीराम भिडे, गुलामराव आठवले, रोशन तायडे, भास्कर जुमळे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Previous Post Next Post