जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध;राष्ट्रपतींना उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत निवेदन...


 जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध;राष्ट्रपतींना उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत निवेदन...

जळगाव जामोद(प्रतिनिधी): 

दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईचा तीव्र निषेध नोंदवत जळगाव जामोद तालुक्यातील विद्यार्थी,तरूणांच्या वतीने उपविभागीय अधिकारी (SDM) यांच्यामार्फत भारताच्या राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात जंतर-मंतर येथील विद्यार्थ्यांवरील कारवाईची निष्पक्ष चौकशी करून संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच देशभरातील विविध स्पर्धा परीक्षा व भरती प्रक्रियेतील पेपरफुटी प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा,अशी मागणी करण्यात आली.याशिवाय,सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुग आणि अभिजीत दीपके यांच्या उपोषणाला नैतिक पाठिंबा व्यक्त करत त्यांच्या मागण्यांवर केंद्र सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंतीही निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी राजरत्न वाकोडे, मुकेश मंत्र वानखडे, चेतन तायडे, अजय वानखडे, सिद्धांत तायडे, अभय तायडे, हर्षवर्धन अंभोरे, प्रदीप वानखडे, साहिल देशमुख, अमर तायडे, पियुष पवार, सुमेध वानखेडे, तिलक वानखडे आणि नंदू तायडे उपस्थित होते.

Previous Post Next Post