एसव्हीपीसी फाउंडेशनच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान..साक्षी ताई वाघमारे यांना कर्तृत्ववान महिला पुरस्कार प्रदान...


 एसव्हीपीसी फाउंडेशनच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान..साक्षी ताई वाघमारे यांना कर्तृत्ववान महिला पुरस्कार प्रदान...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

शेगाव येथील विघ्नहर्ता हॉटेलमध्ये एसव्हीपीसी फाउंडेशनच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा भव्य गौरव सोहळा उत्साहात पार पडला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला.यावेळी मिस आशिया गायत्री रोहनकर, मिसेस महाराष्ट्र मराठवाडा उज्वला ताई काळे, चिखली नगरसेविका मीनल ताई गावंडे, ‘लेख हक्काचे वृद्धाश्रम’ बुलढाणा संस्थापिका सीमा ताई धामणे यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला.याच सोहळ्यात महिलांना ब्युटी प्रशिक्षण देऊन त्यांच्या कौशल्याला योग्य दिशा देत त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या साक्षी निकेतन वाघमारे यांना ‘कर्तृत्ववान महिला पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. साक्षी ताई आपल्या कार्यातून अनेक महिलांना आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत आहेत.कार्यक्रमाच्या आयोजनासाठी एसव्हीपीसी फाउंडेशनच्या संस्थापक जयश्री ताई घाटे तसेच आयोजक निकिता ताई जाधव व पूनम ताई खरात यांनी विशेष परिश्रम घेतले. या गौरव सोहळ्यामुळे विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना नवी प्रेरणा मिळाली.

Previous Post Next Post