दिल्लीतील विद्यार्थी व तरुण-तरुणींवरील पोलिसी अत्याचाराविरोधात जळगाव जामोदचे वकील उतरले रस्त्यावर; उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले तडाखेबंद निवेदन...


 दिल्लीतील विद्यार्थी व तरुण-तरुणींवरील पोलिसी अत्याचाराविरोधात जळगाव जामोदचे वकील उतरले रस्त्यावर; उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले तडाखेबंद निवेदन...

जळगाव जामोद (प्रतिनिधी):

देशभरात गाजत असलेल्या 'नीट' (NEET) पेपरफुटी प्रकरणामुळे निर्माण झालेल्या तीव्र नैराश्यातून आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी नवी दिल्ली येथील जंतरमंतरवर गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर करण्यात आलेल्या अमानुष लाठीचार्जचे तीव्र पडसाद आता जळगाव जामोद येथेही उमटले आहेत. बार असोसिएशन, जळगाव जामोदच्या वतीने या अमानुष व असंवैधानिक कारवाईचा अत्यंत तीव्र शब्दांत निषेध नोंदवत दिनांक २३ जुलै रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांना आक्रमक निवेदन सादर केले आहे.​निवेदनात नमूद करण्यात आल्यानुसार, सध्या देशात सातत्याने होत असलेल्या पेपरफुटीमुळे तरुण विद्यार्थी तीव्र नैराश्यात गेले आहेत. 'नीट' पेपरफुटीनंतर देशभरात तब्बल २१ विद्यार्थ्यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या गंभीर मुद्यावर विद्यार्थ्यांच्या न्याय व हक्कांसाठी गेली तीन आठवडे दिल्लीतील जंतरमंतरवर उपोषण व आंदोलन सुरू होते.आंदोलनकर्त्यांनी सुरुवातीलाच २० जुलैपर्यंत मागण्यांवर तोडगा निघाला नाही तर २० जुलैला संसदेवर मोर्चा काढण्याचा इशारा सरकारला दिला होता. यादरम्यान या २० दिवसांत कोणताच मार्ग न निघाल्यामुळे विद्यार्थ्यांनी जो मोर्चा काढला, 

त्या मोर्चाला पोलिस प्रशासनाच्या मार्फत दंडशाहीच्या मार्गाने चिरडण्याचा जो प्रयत्न झाला तो अतिशय निंदनीय आहे. या अमानुषपणे केलेल्या लाठीचार्जमध्ये अनेक तरुण-तरुणींसह बहुसंख्य विद्यार्थ्यांसोबतच पालक वर्गही गंभीर जखमी झाले आहेत.​लोकशाही असलेल्या देशात अशा असंवैधानिक पद्धतीने एखादे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करणे अत्यंत लाजीरवाणे व निषेधार्ह आहे. त्यामुळे काल दिनांक २०/०७/२०२६ रोजी नवी दिल्ली येथील आंदोलनाला ज्या असंवैधानिक पद्धतीने हाताळण्यात आले, त्याचा बार असोसिएशन  जळगाव जामोदने तीव्र निषेध केला आहे.निवेदन देतेवेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रुपेश विश्वकर, सचिव ॲड. अभिमन्यू वाघ, ॲड. महेश्वरी, ॲड. मळपांडे, ॲड. गिरी, ॲड. मारोळे, तसेच महिला अधिवक्ता ॲड. प्रियांका करंगळे, ॲड. डोंगरदिवे, ॲड. वानखडे, ॲड.जावेद शेख,ॲड.केदार,ॲड.सातव,ॲड.मोसीन खान,ॲड.रतन इंगळे,ॲड.दिपक इंगळे,ॲड.डोंगरदिवे यांच्यासह बार असोसिएशनचे इतर सदस्य उपस्थित होते.

Previous Post Next Post