स्व. उर्मिला कुटे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी भव्य शेतकरी मेळावा.!आधुनिक शेतीपासून दुग्धव्यवसायापर्यंत; तज्ज्ञांचे मार्गदर्शन, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना मिळणार थेट उत्तरे!


 स्व. उर्मिला कुटे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी भव्य शेतकरी मेळावा.!आधुनिक शेतीपासून दुग्धव्यवसायापर्यंत; तज्ज्ञांचे मार्गदर्शन, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना मिळणार थेट उत्तरे!

जळगाव जामोद(प्रतिनिधी):

माजी मंत्री तथा आमदार डॉ. संजय कुटे यांच्या मातोश्री स्व. उर्मिला श्रीराम कुटे यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशनच्या वतीने शनिवार, १ ऑगस्ट रोजी भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.आधुनिक शेती, दुग्धव्यवसाय व शासकीय योजनांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन हे या मेळाव्याचे प्रमुख आकर्षण असणार आहे. सुनगाव रोडवरील श्री कोटेक्स जिनिंग परिसरात सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत हा मेळावा होणार आहे.

या मेळाव्यात दुग्धव्यवसाय, आधुनिक शेती, केळी निर्यात, कोल्ड स्टोरेज, शासकीय योजना तसेच उत्पादनवाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञान याबाबत तज्ज्ञांकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.बदलत्या काळात शेती अधिक फायदेशीर व तंत्रज्ञानाधारित करण्याच्या उद्देशाने स्व. उर्मिला कुटे यांच्या स्मरणार्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणार असून प्रत्यक्ष मार्गदर्शन आणि कार्यशाळाही आयोजित करण्यात आली आहे.परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post Next Post