विद्यार्थ्यांच्या सोईसाठी जळगाव (जा.) ते वरवट बस फेऱ्यांमध्ये वाढ करा...!युवा आंदोलक अक्षय पाटील यांची आगार प्रमुख यांच्याकडे मागणी...!


 विद्यार्थ्यांच्या सोईसाठी जळगाव (जा.) ते वरवट बस फेऱ्यांमध्ये वाढ करा...!युवा आंदोलक अक्षय पाटील यांची आगार प्रमुख यांच्याकडे मागणी...!

जळगाव जामोद (प्रतिनिधी)- 

शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी वरवट (बकाल) संग्रामपुर,निवाणा,चांगेफळ,खेर्डा (बु.),खेर्डा (खु.) या भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने जळगाव जामोद शहरात येतात.विशेष म्हणजे जळगाव (जा.) व वरवट बकाल या रस्त्यावर खेर्डा (बु.) हे मोठे गाव असुन या गावालाच लागुन असलेल्या इतर गावातील विद्यार्थी सुद्धा खेर्डा बु. बस स्टॅन्ड वर मोठ्या संख्येने येतात त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता बस फेरी वाढवणे अत्यंत गरजेचे आहे.तसेच जळगाव शहरातील शाळा,कॉलेज सुटल्यानंतर संध्याकाळी 5/6 वाजेच्या दरम्यान खेर्डा मार्गे वरवट जाणाऱ्या बस फेऱ्या कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे विशेष म्हणजे मुलींना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्रास होत असल्याने पालकांमध्ये असुरक्षतेचे वातावरण तयार झालेले आहेत.अशा या परिस्थितीत विद्यार्थ्यांचा त्रास लक्षात घेता त्यांच्या सोयीसाठी बस फेरी वाढवणे आवश्यक असल्याने आंदोलक अक्षय पाटील व पालकांनी आगार प्रमुख मुकुंद नावकर साहेब यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर विषय सांगून बस फेरी वाढवण्यासाठी चर्चा करून निवेदन दिले.याप्रसंगी शिवदास खिरोडकार,अनिल सिंह राजपूत,अजय गिरी,जितेंद्र चाहेल,वैभव जाणे,आकाश आटोळे,अमोल बहादरे,संतोष गंणगे,सागर गवई, गजानन व्यवहारे तसेच मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

Previous Post Next Post