आषाढी एकादशीनिमित्त खेर्डा येथील गजानन भक्तांची शेगाव पायदळ वारी...


 आषाढी एकादशीनिमित्त खेर्डा येथील गजानन भक्तांची शेगाव पायदळ वारी...

जळगाव जामोद(प्रतिनिधी): 

आषाढी एकादशीनिमित्त दिनांक 24 जुलै रोजी खेर्डा येथील श्री गजानन महाराज भक्तांनी भक्तिमय वातावरणात शेगावकडे पायदळ वारी काढली. "गण गण गणात बोते" आणि श्री गजानन महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात निघालेल्या या पायदळ वारीत महिला, पुरुष, युवक तसेच ज्येष्ठ भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.मुखी नामस्मरण करत भक्तांनी संपूर्ण प्रवासात भक्तीमय वातावरण निर्माण केले.

वारीदरम्यान विविध ठिकाणी ग्रामस्थांनी वारकऱ्यांचे पाणी, अल्पोपहार व इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था करून स्वागत केले.सदर वारी बोराळा काजेगाव मडाखेड चावरा भेंडवळ कठोरा जानोरी मार्गे शेगाव जाऊन गजानन महाराजांचे 25 जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त दर्शन घेऊन पुन्हा हे भक्त परतणार आहेत.पायदळ दिंडीमध्ये भास्कर जाधव,काशिनाथ वानखडे, प्रकाश महाजन,राम वेरुळकर, अनिल देऊळकर, परमेश्वर भोपळे, दीपक राजुरकर, प्रकाश वानखडे, दशरथ भोपळे, विशाल वानखडे, दिलीप म्हसाळ, संतोष उमरकर, शिवाजी म्हसाळ, दिलीप घाटे, नितीन आढाव, हरीओम उमरकर,शारदा भोपळे, पूनम म्हसाळ, दुर्गा भोपळे दुर्गा बंबटकर सोनल भोपळे, मंगला म्हसाळ, पूजा बंबटकार, योगिता म्हसाळ, शितल कुंवर, राजकन्या इंगळे, प्रभाबाई धर्माळ, उमाबाई गायकी, मंगला उमरकर,सीमा देऊळकर, सुनिता घोपे, लक्ष्मी वेरूळकर,मैना बनकर, प्रतिभा ढोकणे सह अनेक भक्तांनी सहभाग घेतला...

Previous Post Next Post