अकोला पोलिसांची मोठी कारवाई: कत्तलीसाठी नेले जाणारे १० बैल मुक्त, आरोपी फरार!


 अकोला पोलिसांची मोठी कारवाई: कत्तलीसाठी नेले जाणारे १० बैल मुक्त, आरोपी फरार!

प्रशांत भोपळे/हिवरखेड...

​अकोला जिल्हा पोलीस दलाच्या 'ऑपरेशन प्रहार' अंतर्गत हिवरखेड पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. कत्तलीसाठी क्रूरतेने नेले जाणारे १० गोवंश (बैल) पोलिसांनी यशस्वीरित्या जप्त करून त्यांना जीवदान दिले आहे.मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, हिवरखेड पोलिसांनी झरी बाजार परिसरात सापळा रचला होता. यावेळी संशयित आरोपी सर्जण दलसिंग भटनागर आणि महेंद्र रोकड्या चापले (दोघेही रा. चंदनपूर, ता. तेल्हारा) हे गोवंश जनावरांना अत्यंत क्रूरपणे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे आढळून आले.पोलिसांनी तातडीने कारवाई करत ३ लाख ८७ हजार रुपये किमतीचा गोवंश मुद्देमाल हस्तगत केला. मात्र, पोलीस कारवाईची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेऊन दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. याप्रकरणी हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक रेड्डी आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हिवरखेडचे ठाणेदार सचिन पाटील व त्यांच्या पथकाने पार पाडली.

Previous Post Next Post