बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी...
खामगांव शहरातील श्रद्धेचे केंद्र असलेल्या प्रभाग क्र. 8, मानाचा लाकडी गणपती मंदिर व खाटू श्याम मंदिर परिसरातील कमान गेट जवळील मुख्य नाली गेल्या 6 महिन्यांपासून पूर्णतः चोकअप झाली आहे. या नालीला परिसरातील सर्व गल्लीतील नाल्यांचे पाणी जोडलेले असल्याने घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे.या गंभीर समस्येबाबत _महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सुरज एस. यादव_ यांनी आज दुपारी 3.44 ला नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना लेखी तक्रार अर्ज सादर करून तातडीने कार्यवाहीची मागणी केली. _तक्रारीतील प्रमुख मुद्दे:_ 1. _विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात_ - शाळकरी मुले रोज या घाण नालीच्या पाण्याच्या दुर्गंधीत उभे राहून शालेय वाहनांची वाट पाहतात. 2. _पोलिसांना त्रास_ - सण-उत्सव व मिरवणुकीच्या वेळी याच ठिकाणी पोलीस बंदोबस्त असतो. तासन-तास घाणीत ड्यूटी करावी लागत आहे. 3. _धार्मिक भावना दुखावली_ - हा मार्ग मानाच्या लाकडी गणपती मंदिर व खाटू श्याम मंदिराकडे जातो. गणेशोत्सवात बाप्पाची पहिली मिरवणूक येथूनच निघते. चतुर्थी-एकादशीला हजारो भाविक येतात. 4. _रोगराईचा धोका_ - साचलेल्या घाण पाण्यामुळे डेंग्यू, मलेरिया सारखे संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता.गणेशोत्सव काही दिवसात सुरू होत आहे. लाखो भाविकांच्या दृष्टीने प्रभाग क्र. 8 मधील सदर मुख्य नालीची _तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती, रुंदीकरण व स्वच्छता_ करण्यात यावी.वेळेत कार्यवाही न झाल्यास नागरिकांसोबत आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा सुरज यादव यांनी दिला.या तक्रार अर्जाची प्रत मा. नगराध्यक्षा, नगर परिषद खामगांव व मा. पोलीस निरीक्षक, शिवाजी नगर पोलीस स्टेशन यांनाही देण्यात आली आहे.
