केळी पिकाला योग्य भाव द्या शेतकरी वर्गांची मागणी...


 केळी पिकाला योग्य भाव द्या शेतकरी वर्गांची मागणी...

अर्जुन खिरोडकार/प्रतिनिधी...

हिवरखेड भागात शेतकरी वर्गाकडून संध्या शेतीसंदर्भात केळी पिक हाताशी उरले असून, कपाशी पिक येई पर्यंत केळी पिक हाच अधिक उत्पादना करिता योग्य पर्याय उरलेला आहे, परंतु केळी पिकाला सुद्धा शासनाकडून जसा भाव मिळायला पाहिजे तसा योग्य तो भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी केळी पिकासाठी लावलेला तो खर्च काढणे शर्यतीचे प्रयत्नच करावे लागत आहे,.असे म्हणणे वावगे ठरणार नाही, पिकांन मध्ये मुंग् उळीद, तर फार कमी झाले  कपाशी आणि सोयाबीन पिकांची संध्या मशागत सुरू असून हे पिक पूर्ण तयार होण्यासाठी बराच वेळ आहे,  संध्या शेतकऱ्यांना केळी पिकचं उपयोगाचे आर्थिक बाजू मजबूत करण्याची संधी देणारे आहे,या पिकाला शासनाने चागला हमी भाव दिला तर नक्कीच शेतकऱ्यांच्या पदरात यश येऊ शकते शासनाने त्वरित केळी पिकाला चांगला भाव द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून जोर धरत आहे,

__________________________

आम्हा शेतकऱ्यांना पीक पेरणी करताना निसर्गाच्या आर्थिक संकटाचा मोठा सामना करावा लागतो, संध्या केळी पिकांवर जोर असून या पिकावर,लाल्या, या प्राद्र्भावाचा सामना करावा लागत आहे, जिल्हा अधिकारी यांनी तत्काळ केळी पिकांचे भाव वाढवण्यासाठी दखल घ्यावी,

प्रसन्न पिंजरकार,

(युवा शेतकरी हिवरखेड)

___________________________________

आम्हा शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य भाव शासनाने द्यावा पाहिजे 

तसेच योग्य वेळी कृषी विभागाडून सर्वे होऊन त्यांची अंमलबजाणी होयायला पाहिजे यामुळें शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो,


प्रदीप पाटील,

(शेतकरी हिवरखेड)

Previous Post Next Post