संघटन अधिक मजबूत करून विजयाची नवी दिशा ठरविण्याचा निर्धार..पुण्यात भाजप प्रदेश कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक; आ.डॉ. संजय कुटे यांनीही केले मार्गदर्शन;


 संघटन अधिक मजबूत करून विजयाची नवी दिशा ठरविण्याचा निर्धार..पुण्यात भाजप प्रदेश कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक; आ.डॉ. संजय कुटे यांनीही केले मार्गदर्शन; 

आर सी २४ न्युज नेटवर्क पुणे: 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे भाजप प्रदेश कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत पक्षाची संघटनात्मक बांधणी, आगामी राजकीय वाटचाल आणि विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.बैठकीत दिवसभर झालेल्या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे आणि पक्षाची भूमिका तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले. बूथस्तरापासून पक्षाची संघटना अधिक मजबूत करून आगामी काळातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांच्या अधिकारांच्या प्रश्नावर काँग्रेस व विरोधी पक्षांच्या भूमिकेवर टीका केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिला सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि आत्मनिर्भरतेसाठी केंद्र सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजना व उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.‘सबका साथ, सबका विकास’ या विचारधारेतून समाजातील सर्व घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्याचा संकल्प अधिक दृढ करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.

या बैठकीस केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा भारती पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांतदादा पाटील, आशिष शेलार, गिरीश महाजन, गणेश नाईक, पंकजाताई मुंडे, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम, खासदार अशोक चव्हाण, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह प्रदेश सरचिटणीस तथा माजी मंत्री आमदार डॉ. संजय कुटे, आमदार निरंजन डावखरे, माधवी नाईक, सुनील राणे, राजेश पांडे तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post