शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना आक्रमक खामगाव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा ची मागणी...


 शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना आक्रमक खामगाव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा ची मागणी...

बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी...

पिक पाहणी साठी पूर्वी शेतकरी यांना मुभा होती परंतु आज आपली पिक पाहणी शेतकऱ्याला करता येत नाही. तसेच ग्राम महसूल अधिकारी यांचे कडे हे सुद्धा पिक पाहणी चे काम नाही ग्राम महसूल अधिकारी यांना ई पिक पाहणी साठी गावातील व्यक्ती सहायक दिला आहे.आणि त्यांचे शिवाय पिक पाहणी कोणालाही करता येत नाही. आज शेतकरी अतिशय चिंतातुर, चिंताग्रस्त झाला आहे. वरून राजाची सुद्धा कृपा होत नाही. आणि खामगाव तालुक्यात दिनांक 31/8/2026 पासून ई पिक पाहणी चे कामा बाबत सहाय्यक यांची काम बंद बेमुदत संप अशा प्रकारे ग्रुप वर पोस्ट शेअर झाली आहे. त्यांचेही साहजिक आहे. कारण त्यांच्या मागण्या आहेत.तो त्याचा वैयक्तिक विषय आहे.माझी आपणास नम्र विनंती आहे की ई पिक पाहणी खरीप हंगामात झाली नाही आणि खरीप पीक पाहणी हंगामचा कालावधी जर निघून गेला तर आपल्या 7/12 वर ई पिक पेरा येणार नाही त्यामुळे आपल्याला आपल्या विविध कामासाठी उदा.बँक, विमा,फळपीक अनुदान इत्यादीसाठी  7/12 च्या अडचणी निर्माण होऊ शकतात.तसेच मागील महिन्याभरापासून पावसाने दांडी मारल्यामुळे कोरडवाहू पिके पावसाअभावी    पूर्ण जडून गेली आहे काही शेतकऱ्यांना पाणी देण्याचे साधन आहेत परंतु लोड सेटिंग विजेचा लपंडाव असल्यामुळे पिकांना पाणी देणे शक्य होत नाही आहे अशा सर्व बाबीमुळे शेतकरी अत्यंत हवालदिन झाला आहे. व शेतकऱ्यांच्या पिकांचे अत्यंत नुकसान झाले आहे तरी आपण आपल्या स्तरावरून आदेश देऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत करावी,व खामगाव तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करावा तसेच ई पीक पाहणी लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्याला होणारा त्रास टाढावा   ही आपणास नम्र विनंती असे नाही झाल्यास शिवसेना लोकशाही मार्गाने पुढील आंदोलन शेतकऱ्यांच्या हितासाठी तीव्र असेल याची आपण नोंद घ्यावी.संजय आवताडे शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र बघे शिवसेना तालुकाप्रमुख गजानन लोखंडकर शिवसेना नेते चेतन ठोंबरे शहर प्रमुख जयश्री देशमुख महिला आघाडी तालुकाप्रमुख ज्योति बुजाडे कल्पना गायगोड निर्मलाबाई हेलोडे गोपाल भिल गजानन मोरखडे सुभाष वाकुडकर प्रवीण धामोडे उपतालुकाप्रमुख किसान सेना तालुकाप्रमुख सोपान वाडेकर सोशल मीडिया उपजिल्हाप्रमुख अमोल फिरंग बहादूर वाघे युवा सेना तालुकाप्रमुख विकास जवंजाळ शहर समन्वयक भाऊ बिडकर करण छापरवाल उपशहर प्रमुख शुभम मोरे प्रकाश हिवराळे अनुसूचित जाती जमाती तालुकाप्रमुख मंगेश काळे नामदेव ताले ओम देशमुख निवृत्ती शेवाळे चेतन शेलकर प्रभाकर बघे नारायण टिकार महादेव टिकार गणेश ढगे प्रभू घोंगे सुनील नवले मारुती जगताप मुकुंद चिकटे योगेश देशमुख राजेश गावंडे लक्ष्मण सोळंके गोपाल शेळके राम कृष्ण वायाळ यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post