दीर्घ सेवेला सलाम! वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार;
अनिल भगत/बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी...
बुलढाणा जिल्हा पोलीस दलात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय सेवा बजावलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती झाल्याने त्यांच्या सन्मानार्थ पोलीस कल्याण शाखा, बुलढाणा येथे निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, पोलीस निरीक्षक बी.डी. पावार, प्रभारी पोलीस अधीक्षक (मुख्यालय) बुलढाणा यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व अंमलदारांमध्ये पोलीस कल्याण शाखेचे पोउपनि. विजय यादवराव हुडेकर,AHTU चे श्रेणी पोउपनि. रईस खान अताउल्ला खान, पोलीस स्टेशन शेगाव ग्रामीणचे स.फौ. अब्दुल अजिज मो. सौदागर, पोलीस स्टेशन खामगाव शहर चे स.फौ विष्णू लक्ष्मण मुंडोकार, पोलीस स्टेशन बुलढाणा शहर च्या स.फौ.कोकीळा हतेसिंग तोमर, गजानन महाराज मंदिर सुरक्षेचे स.फौ. शिवाजी रामकृष्ण दळवी,आर्थिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ. भरतसिंग कैय्यारसिंग राजपूत,पोलीस मुख्यालय बुलढाणा चे पोकॉ. लक्ष्मण भुंजाराव आघाव,जिवानीशा चे पोकॉ. जितेंद्रसिंग जयपालसिंग ठाकूर, वरीष्ठ श्रेणी लिपिक अतुल शरद शिराळकर आणि बी.डी.डी.एस चे शेख हमीद शेख लतीफ यांचा समावेश होता.या सर्व सेवानिवृत्त अधिकारी-अंमलदारांचा पोलीस विभागाच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पहार व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात उपस्थित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदारांच्या सेवाकाळातील योगदानाचे कौतुक केले.पोलीस दलात कर्तव्य बजावताना त्यांनी केलेल्या प्रामाणिक व उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य निरोगी, आनंदी आणि सुखसमृद्धीचे जावे, यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदारांनीही आपल्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा देत पोलीस विभागातील सहकाऱ्यांचे आभार मानले.अधिकारी-अंमलदारांचे कुटुंबीय व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुमारे ७० कुटुंबीय व नातेवाईकांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यामुळे कार्यक्रमाला कौटुंबिक आणि भावनिक स्वरूप प्राप्त झाले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोहेकॉ. निलेश रणपिसे यांनी केले. निरोप समारंभानंतर उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.पोलीस सेवेत अनेक वर्षे कर्तव्य बजावून निवृत्त झालेल्या सर्व अधिकारी-अंमलदारांना बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पुढील निरोगी, आनंदी व सुखी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.सदर कार्यक्रमाला पोलीस उपनिरीक्षक शे इंद्रिस, पोलीस कॉन्स्टेबल किशोर ताजने, महिला पोलीस कॉन्स्टेबल रेखा बकाल, भारती जाधव उपस्थित होते.

