जळगाव जामोद(प्रतिनिधी);
स्थानिक श्री संत रुपलाल महाराज मंगल भवन जळगांव जामोद जिल्हा बुलढाणा येथे दिनांक 2ऑगस्ट 2026 रोजी बारी समाज युवक प्रगती मंडळ, जळगांव जामोद च्या विद्यमाने 38 वा गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न झाला.समारंभाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याद्यापक पुंजाजी ताडे सर तर प्रमुख अतिथी म्हणून मंडळाचे अध्यक्ष सुहास भुते सर,प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. शंकरराव दलाल, ब्रह्मकुमारी जयश्री दीदी, न. प. उपाध्यक्ष कैलास पाटील, माजी न. प. उपाध्यक्ष तुकाराम काळपांडे, नगरसेवक राजु हिस्सल, नगरसेविका पुष्पाताई अंबडकार, रुपाली डोबे, प्रियंका येऊल, माजी नगरसेवक श्रीकृष्ण केदार, सखाराम ताडे व मंडळाचे माजी अध्यक्ष पांडुरंग म्हस्के हे उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते श्री संत रुपलाल महाराजांचे प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, सर्वप्रथम ब्रह्मकुमारी जयश्री दीदींनी नशामुक्ती बाबत मार्गदर्शन केले व नशामुक्तीची सर्वांकडून प्रतिज्ञा करून घेतली तसेच मान्यवरांची यथोचित भाषणे झाली.
त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला, यामध्ये इयत्ता बारावी मधून प्रथम अनुज ढगे तर द्वितीय पियुष वराडे याला तसेच मुलींमधून प्रथम कु अनुष्का हिस्सल तर द्वितीय कु साक्षी काळपांडे हिला, वर्ग दहावी मध्ये प्रथम पार्थ ढगे द्वितीय प्रणित येऊल, तर मुलींमधून प्रथम कु रितू फुसे तर द्वितीय कु प्राची ढगे हिला व इयत्ता चौथी ते बारावी पर्यंत सर्व प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा तसेच वैभव शंकर मिसाळ हा सी ए ची परीक्षा उत्तीर्ण झाला तसेच डॉ. सतीश हागे यांनी फोटोग्राफी विषयामध्ये डॉक्टरेट मिळवली. MBBS पदवी प्राप्त डॉ. स्नेहा कपले, डॉ.शुभम धुर्डे व पूर्व मा. शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात सातवा आलेला सार्थक कोथळकार तसेच आदित्य कपले, कु वैदवी भगत व तेजस हिस्सल यांनी खेळामध्ये प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.अशा एकूण 60 विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले व इतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहित करण्यात आले. रामा धूर्डे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सखुबाई धूर्डे यांनी तर गोविंदराव केदार व मथुराबाई केदार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्रीकृष्ण केदार यांनी प्रोत्साहन पर वैयक्तिक बक्षिसे दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे उपाध्यक्ष रवींद्र काळपांडे यांनी केले, संचलन मंडळाचे सदस्य विक्रांत डोबे व कु आरती भगत हिने तर आभार प्रदर्शन मंडळाचे सदस्य संजय कोथळकार यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीते करता मंडळाचे सदस्य श्रीकृष्ण हिस्सल, गजानन डोबे, प्रतीक राऊत, प्रवीण कोथळकर, निलेश धुर्डे, मोहन ढगे,गजानन कोथळकर, नारायण कोथळकर यांनी परिश्रम घेतले.
