देविदास शर्मा यांचा संजरी फाऊंडेशन ने केला सन्मान..देविदास शर्मा यांचे कार्य प्रेरणादायी_ईसा शेख...


 देविदास शर्मा यांचा संजरी फाऊंडेशन ने केला सन्मान..देविदास शर्मा यांचे कार्य प्रेरणादायी_ईसा शेख...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

वैष्णव जन तो तेणे कहिये रे पिर पराई जाने रे आयुष्य भरात केलेल्या उत्तम कार्याची समाज नकळत दखल घेत असतो  माणूस वयाने किंवा पैश्याने मोठा होत नसतो तो आपल्या कर्मा ने मोठा होत असतो देविदास उर्फ मुन्ना शर्मा यांचे कार्य म्हणजे एखादी व्यक्ती वस्तू किंवा गोष्ट दिसायला अत्यंत सामान्य लहान किंवा साधी असली तरी तिच कार्य कर्तत्व गुण खुप मोठे आणी प्रभावी असते बाह्य रूपावरुन कोणाच्याही क्षमतेचा अंदाज बांधु नये कारण खरी मानवता कार्यात असते शरीरात नाही ते कार्य मग लहान असो वा मोठ दिन. दुबळ्यांची. पिडीतांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा मानली जाते काही जण शांतपणे आपलं कर्तव्य करत राहतात ना कौतुकाची अपेक्षा.ना मानपाण भक्तीच्या मार्गावर ही अशीच माणसं देवाने पाठवलेली दूत असतात.

जशी कृपा अदृश्य असली तरी सतत सोबत असते तसंच सज्जनांचं प्रेम न बोलताही जाणवत राहतं आजच्या धावपळीच्या जगात आपणही समाजा प्रती आपले समर्पण.निस्वार्थ सेवा आणी उल्लेखनिय सामाजिक कार्या बदल समाजातील दुर्लक्षित घटकासाठी गरजुंच्या मदतीसाठी आणी विधायक कार्यासाठी देविदास शर्मा यांचे कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. समाजाला नवी दिशा देणारे आहे त्यांच्या या कार्याची दखल राष्ट्रीय व राज्य पातीळवर घेतल्या जात असुन त्यांना राष्ट्रीय भारत गौरव सर्वोच्च संम्मान पुरस्कार.राष्ट्रीय महाराष्ट्र भुषण पुरस्कार. बहुजन समाज महाराष्ट्र रत्न पुरस्कार. विश्वकर्मा समाज महाराष्ट्र रत्न पुरस्कार. छत्रपती शाहु महाराज जिवन गौरव. इंडियन एक्सलन्स अवार्ड. नॅशनल आयकॉन अवार्ड.सेवा गौरव पुरस्कार. खामगांव अभिमान पुरस्कार. महाराष्ट्र लोकनायक राज्यस्तरीय पुरस्कार असे अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्काराने सम्मानित झाले आहे त्यांचे निस्वार्थ सेवाभावी कार्य पहाता संजरी फाऊंडेशन तर्फे ८० वा स्वातंत्र्य दिवसाचे औचित्य साधुन १५ ऑगष्ट २०२६ शनिवार  रोजी पुणे येथुन संम्मानपत्र देवून ऑनलाईन गौरव करण्यात आला या प्रसंगी संजरी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मुबारक अली कासम अश्रफी. समन्वयक ईसा शेख. असफ ईसा शेख व संजरी फाऊंडेशनचे सर्व सदस्य हजर होते हे सन्मान पत्र सदगुरू एकनाथ महाराज संस्थान रानमळा धुळे अध्यक्ष आबा पानगे.उपाध्यक्ष नाना महाराज पानगे. दिंडी प्रमुख जयरामजी खर्चे.सुधाकर आटोळे. शिवाजी गावडे. विक्कि देशमुख.सुशिला आवलकर.मंगला बावस्कर.संगिता वाघोळे. शालीनी देशमुख.वर्षा देशमुख.बेबी आवलकर.यांच्या हस्ते देविदास शर्मा यांना प्रदान करण्यात आला.

Previous Post Next Post