प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी...
हिवरखेड पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अडगावं बु येथे पोलिस पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांना भीम नगरातील कसाई पुऱ्यात दोन इसम अवैध गौमास कत्तल करत असल्याचे पोलिसांना आढळून आले, पोलिसांनी घटनास्थळून गोवंश मास अंदाजे ६५ किलो दोन लोखंडी कुऱ्हाड, लाखडी दांडा, दोन धारधार चाकू, दोन लोखंडी तराजू, एक लोखंडी टोचा, असा मुद्देमाल एकूण किंमत २२,६००, रुपयांचा जप्त केला असून आरोपी शेख अमीन शेख मुनाफ वय ( ३९ वर्षे रा कसाई पुरा ). नसीम अहमद शेख इस्माईल वय ३०, वर्षे रा कसाईपुरा दोन्ही आरोपी अडगावं येथील रहिवाशी असून याच्या विरुद्ध प्राणी सुरक्षा संरक्षण कायद्या अंतर्गत कलम ३२५, ५,५(अ) ९,९, ( अ). नुसार गुन्हा दाखल करण्यात आला, सदरची कारवाई अकोला अधिक्षक, अकोट निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली ठाणेदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय, गोपाल गिलबिले, पोलिस कर्मचारी, प्रवीण कुंजाम,विनोद खर्डे, योगेश इंगळे,रोशन ठाकूर, रोहन बोराडे, महिला शिपाई अश्विनी करवते यांनी केली, या कारवाईने अडगावं बू येथील दारू, गुटखा, वरली, डीझेल, यासह अवैध धंदे करणाऱ्याचे धाबे दणाणले
