बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी...
जळगाव जामोद व संग्रामपूर तालुका माळी समाज महात्मा फुले मंडळ यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी आणि प्रज्ञावंत व्यक्तींचा भव्य सत्कार सोहळा रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी उमादेवी सभागृह, कृषी विज्ञान केंद्र, जळगाव जामोद येथे उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार कृष्णरावजी इंगळे होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि श्री संत सावता महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी समाजबांधव, विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक अकोला येथील ललित काळपांडे सर यांनी दहावी व बारावीनंतर विद्यार्थ्यांसमोर उपलब्ध असलेल्या शिक्षणाच्या विविध संधी व करिअरच्या वाटांवर सविस्तर मार्गदर्शन केले. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणाबरोबरच व्यावसायिक, तांत्रिक आणि कौशल्याधारित शिक्षणाकडेही सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे. आपल्या आवडीनुसार व क्षमतेनुसार करिअरची निवड करून भविष्यातील संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.अकोला येथील सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. निलेश श्रीकृष्ण वानखडे व डॉ. सौ. नेहा निलेश वानखडे यांचा समाजभूषण म्हणून सपत्नीक सत्कार करण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत समाजाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या या दाम्पत्याचा सन्मान झाल्याने उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले.या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात सात डॉक्टर, दोन चार्टर्ड अकाउंटंट (सीए) यांच्यासह विविध शैक्षणिक क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या सुमारे २५० गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला.समाजातील गुणवंत विद्यार्थी, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणारे युवक-युवती आणि प्रज्ञावंत व्यक्तींचा सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन शैक्षणिक प्रगतीसोबतच समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासाला चालना मिळते,असे मत डॉक्टर स्वातीताई वाकेकर यांनी प्रास्ताविकातून केले.
कार्यक्रमाच्या मंचावर अध्यक्ष माजी आमदार कृष्णरावजी इंगळे, प्रमुख मार्गदर्शक ललित काळपांडे (अकोला), समाजभूषण डॉ. निलेश वानखडे, डॉ. नेहा वानखडे, माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अरुण तीखे, डॉ.स्वातीताई वाकेकर, उर्मिलाताई इंगळे, प्रा. भाऊसाहेब इंगळे, ऍड ज्योतीताई ढोकणे,प्रकाशशेठ ढोकणे,महादेवराव घुटे, वासुदेवराव भोपळे, ग.दी. वानखडे,रामदास वाकेकर, गौरीताई सातव,प्रवीण भोपळे, वैशाली तायडे, सुखदेव उमरकर, त्र्यंबकराव घाटे, वंदनाताई तिखे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन डॉ. सुपडा इंगळे व दिपाली इंगळे यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन ज्ञानदेव राजनकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन सातव, विजय म्हसाळ, सारंगधर गोमासे,प्रभुदास बोंबटकर, डॉ संदीप वाकेकर,पांडुरंग भोपळे, संदीप शिरेकर, राजीव घुटे, संदीप मानकर, गोपाल इंगळे, मुकुंद दाते, मधुकर वानखडे, , ऍड. रतन इंगळे, मारोती वानखडे, दिपक उमाळे, संतोष वानखडे अरुण राखोडे, मधुकर वानखडे, सुधाकर जाधव,यांच्यासह महात्मा फुले मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, प्रज्ञावंत व्यक्तींचा गौरव आणि विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक व व्यावसायिक संधींबाबत मिळालेले मार्गदर्शन यामुळे जळगाव जामोद व संग्रामपूर तालुका माळी समाजाचा हा सत्कार सोहळा समाजासाठी प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला.
