राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
दरवर्षी प्रमाणे या वर्षी पण मेळघाटात जागतिक आदिवासी दिवस ९ ऑगस्ट २०२६ ला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.प्रत्येक गावाच्या ठिक ठिकाणी नेते मंडळी ची पण उपस्थित पाहण्यास मिळाली आहे.त्याच प्रमाणे चिखलदरा तालुक्यातील चादंपुर व गौलखेडा बाजार या गावाच्या ठिकाणी पण बिरसा मुंडा च्या वेशभूषा मध्ये तसेच त्यांच्या संस्कृती प्रमाणे आदिवासी जागतिक दिवस मेळघाट क्षेत्राचे आमदार केवलराम काळे व माजी जिल्हा परिषद सभापती दयाराम काळे यांच्या हस्ते मुठवा देवाची पुजा पाठ करुन मोठ्या उत्साहात पार पडला आहे. तसेच चादपुर या गावात जागतिक आदिवासी दिवसाच्या कार्यक्रमात अनेक गावांच्या लोकांनी नृत्यां मध्ये भाग घेतले आहे.या कार्यक्रमाला येसस्वी करण्यासाठी धारणी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश जामकर,रामजी सावरकर रामकीशन सावलकर यांनी पार पाडले आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून आमदार केवलराम काळे, सभापती रोहीत पटेल,सरपंच शैलेश गावंडे, मा. सभापती दयाराम काळे, उपसभापती राहुल येवले, सहदेव बेलकर,बन्सी जामकर,कविता काळे, असे अनेक मान्यवर व गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
