श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळ महाराष्ट्र लोकनायक पुरस्काराने संम्मानित...देविदास शर्मा यांना महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार देवून केला विशेष सत्कार...


 श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळ महाराष्ट्र लोकनायक पुरस्काराने संम्मानित...देविदास शर्मा यांना महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार देवून केला विशेष सत्कार...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

 हिन्दी.मराठी पत्रकार संघ द्वारा लोकमान्य टिळक जयंती व दैनिक लोकयुवा वर्धापन दिवस निमित्ताने विविध क्षेत्रातील कर्तृत्वान व्यक्तीचा गौरव करण्याच्या उद्देशाने व त्यांच्या कलागुनांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार २०२६ चे आयोजन करण्यात आले होते  यामध्ये खामगाव येथील सतिफैल भागातील श्री सदगुरू एकनाथ महाराज भजन मंडळ व अध्यक्ष देविदास शर्मा यांची निवड करण्यात आली होती.सामाजिक क्षेत्रातील निस्वार्थ उल्लेखनीय कार्याचा ठसा प्रभावीपणे लक्षात आला या कार्यासाठी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला व श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाचा विशेष सत्कार करण्यात आला.

हा पुरस्कार व्यक्तीच्या कार्याचा आणि योगदानाचा गौरव करतो आणि त्यांना समाजा साठी अधिक चांगले कार्य करण्यासाठी प्रोत्साहित करतो पुरस्कारा साठी निवड करताना व्यक्तीच्या कार्याचे समाजावर होणारे परिणाम आणि इतरांना प्रेरणा देण्याची क्षमता विचारात घेतली जाते व सन्मानित करण्यात येते. दिं २ ऑगष्ट २०२६ रविवार रोजी संत श्री गजानन महाराज अभियांत्रिकी महाविदयालय स्वामी समर्थ हॉल येथे आयोजीत भव्य दिव्य सोहळ्यात शेगांव येथे प्रदान करण्यात आला  सतिफैल भागातील  सामाजिक.धार्मिक क्षेत्रात भरीव योगदान देणारे पशु पक्ष्यांची निस्वार्थ सेवा करणारे श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाचे  संस्थापक अध्यक्ष देविदास ऊर्फ मुन्नाभाऊ शर्मा यांना शाल.सन्मान चिन्ह.सुवर्ण पदक. व प्रशस्तिपत्र देवून जेष्ठ पत्रकार तरुणभारत जिल्हा प्रतिनिधी विजय कुळकर्णी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला  तसेच श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या सर्व सदस्यांना प्रशस्ती पत्र देवून विशेष सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनश्रीताई काटीकर अध्यक्ष हिन्दी मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य.चंद्रकांत घोराले भाजपा तालुका अध्यक्ष. बाळासाहेब दामोदर जिल्हाअध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.हा पुरस्कार केवळ एक वैयक्तिक गौरव नव्हे तर सतिफैल.खामगाव तालुक्या सह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासाठी खुप मोठा गौरव आहे.मागील २६ वर्षापासून निरंतर श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या कार्याचा केंद्र बिंदू नेहमी मानव सेवा सामाजिक क्षेत्रात गरीबांसाठी अन्नदान. ब्लॅकेट वाटप. पक्ष्यां साठी पाणी पात्र वाटप. असे अनेक उपक्रम वर्ष भर श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळ निस्वार्थ पणे राबवित असते भजनी मंडळाच्या सेवा भावी समर्पित कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जात असून त्यांचा अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले असुन अनेक नामांकित संस्था.मंडळे यांच्या वतीने सुद्धा संम्मानित करण्यात आले आहे 

________________________________

याप्रसंगी मंडळाचा विशेष सत्कार जेष्ठ सदस्य पोलीस अधिकारी शेषरावजी अंभोरे.दिलीप झापर्डे. लालाजी सांगळे. गंगाधर पवार.प्रमोद सुरंगे.आशा अंधारे.पार्वता सुकाळे. शकुंतला ढवळे.मंगला बारस्कर.संगिता वाघोळे.उषा शर्मा.अंबिका काटकर.जान्हवी शर्मा. किर्ती शर्मा.आराध्या ढवळे यांना प्रशस्ती पत्र देवून विशेष सन्मान करण्यात आला.

________________________________

या आधी देविदास शर्मा यांना राष्ट्रीय भारत गौरव सर्वोच्च संम्मान पुरस्कार.इंडियन एक्सलन्स अवार्ड. राष्ट्रीय महाराष्ट्र भुषण पुरस्कार. महाराष्ट्र बहुजन रत्न पुरस्कार. विश्वकर्मा महाराष्ट्र रत्न पुरस्कार. शाहु महाराज जिवन गौरव पुरस्कार. नॅशनल ऑयकॉन अवॉर्ड २०२५. राष्ट्रीय राजा शिवछत्रपती पुरस्कार.खामगाव अभिमान पुरस्कार व अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहे.पुरस्कार स्विकारल्या नतर भावना व्यक्त करतांना देविदास शर्मा यांनी दैनिक लोकयुवा चे व त्यांच्या सर्व टिम चे खुप खुप आभार मानले त्यांनी भजनी मंडळाच्या सेवा भावी कार्याची दखल घेतली व पुरस्कार प्रदान केला कार्यकम यशस्वीतेसाठी प्रा प्रकाश थाटे.सुधाकर तायडे.अमोल वानखडे. मयुर लड्डा.देवेन्द्र जयस्वाल.दत्तात्रय भोंडेकर यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल केसकर यांनी तर आभार प्रदर्शन श्रीकृष्ण तायडे यांनी केले

Previous Post Next Post