हिवरखेड ग्राहकांनी पोलिस स्टेशनला फसवणुकीचा अर्ज,माऊली मल्टिस्टेट बँक मधील हा प्रकार,माऊली कडून ग्राहकांना तारीख पे तारीख..

 

हिवरखेड ग्राहकांनी पोलिस स्टेशनला फसवणुकीचा अर्ज,माऊली मल्टिस्टेट बँक मधील हा प्रकार,माऊली कडून ग्राहकांना तारीख पे तारीख..

अर्जुन खिरोडकार/हिवरखेड प्रतिनिधी... 

हिवरखेड माऊली मल्टिस्टेट शाखा या बँकने शेकडो ग्राहकांना चुना लावल्याचा अर्ज ग्राहकांनी थेट पोलिस स्टेशन मध्ये दाखल केला,माऊली अर्बन या बँक मध्ये अनेक ग्राहकांनी चांगले व्याज दर मिळते या लालचापोटी ग्राहकांनी मोठ मोठ्या रक्कम जमा केल्या तर या शाखेचे एजंट यांनी सुद्धा आपल्याला चांगले कमिशन मिळावे म्हणून खूप जास्त प्रमाणात ग्राहकांचे खाते आपल्या बँक मध्ये उघडण्याचे कार्य युद्धस्थरावर केले, परंतु गेल्या काही दिवसांपासून या शाखेकडून ग्राहकांना त्यांचे ठेवीचे पैसे बँके कडून परत देणे बंद झाले याबाबत ग्राहकांनी नाराजी व्यक्त करीत बरीच प्रतीक्षा केली मात्र बँक कडून फक्त तारीख पे तारीख देण्यात आली, या दरम्यान आपल्या कष्टाचे पैसे बुडाले तर नाही ना असा विचार केल्याने एका ग्राहकाचे निधन झाल्याची चर्चा या शाखेचे ग्राहक करीत आहेत, तरीही या बँकेला जाग आली नाही व बँकेचे काही संचालक, कर्मचारी या शाखेचे संस्थापक अध्यक्ष नाशिक यांचा मूळ निवासी जाऊन आले त्यांना सुद्धा मिळाली ती फक्त तारीख,यावरून आज दिनांक ३१, ऑगस्ट रोजी दुपारी २, ग्राहकांनी पोलिस स्टेशनमध्ये अर्ज केला आमची फसवणूक झाली अर्जदार शेख नाजीम शेख हुसेन वय (४३ वर्षे रा इंदिरा नगर हिवरखेड) या ग्राहकाने शुभम वाकोडे (एजंट)ओमप्रकाश चतुरकार (शाखा व्यवस्थापक) यांच्या नावाने अर्ज पोलिस स्टेशन मध्ये दाखल केला,पोलिसांनी अर्ज स्वीकारला असून हा अर्ज आम्ही ठाणेदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निबंधक कार्यालय अकोला यांना सुप्रुत करण्याची माहिती हिवरखेड पोलिसांनी दिली,

हिवरखेड सह आजू बाजूच्या खेड्यापाड्यातील ग्राहकांनी वेग मोठ्या आशेने व या बँकेत ओळखीचे मोठ मोठे संचालक असल्याने आपल्या ठेवी येथे जमा केल्या मात्र याचे उलट फळ ग्राहकांना मिळत असल्याचे समजते,

वरिष्ठांन कडून आम्हाला ग्राहकांना व्हिड्रोल करण्याची ३१ ऑगस्ट ही तारीख दिला होती परंतु त्यांची या दरम्यान काही व्यवस्था न झाल्याने आम्ही लवकरच सर्व माऊली शाखेचे कर्मचारी बँक शाखा संस्थापक अध्यक्ष नाशिक यांच्या निवासस्थानी जाऊन पुढील निर्णय घेऊ,

ओमप्रकाश चतुरकार 

( माऊली उप शाखाअधिकारी हिवरखेड)

ग्राहक काय म्हणतात 

आमच्या हक्काचा व कष्टांचा पैसा बँकने नाही दिल्यास आम्ही विविध आंदोलने करू, उपोषण करू, संध्या या महागाई मध्ये आम्हाला आमच्या पैशांची नितांत गरज भासत आहे, मुलाचे शिक्षण दवाखाना , मेडिकल, शेती काम, दैनंदिन आहार याकरिता सुद्धा आमचाच पैसा आमच्या कामी नाही पडत आहे,, ,,,

Previous Post Next Post