अर्जुन खिरोडकार/हिवरखेड प्रतिनिधी..
हिवरखेड प्रभाग क्रमांक १मधील भाग दोनच्या अंगणवाडीत दिनांक २९ ऑगस्टच्या दुपारी नवचेतना आधारशिला वेलकम मेळावा घेण्यात आला, यामध्ये अंगणवाडीच्या पाल्यांना आमंत्रित करण्यात आले होते, या कार्यक्रमाचे अध्यक्ष अमित रायबोल,(सी पी ओ) वैशालीताई बोदडे (प्रवेशिका). पुष्पाताई राठोड (प्रवेशिका) यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविका दुर्गाताई दाते, दुर्गा अस्वार यांनी हा मेळावा पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले यावेळी प्रमुख उपस्थितीत पल्लवी खिरोडकार, राजनकार, बोहरा, वैद्यकीय विभागाचे ढोढरे , अर्जुन खिरोडकार, होते तर कार्यक्रमाचे संचालन पूजा दामधर, संजीवनी रायबोले, वहिदा पठाण यांनी केले, यावेळी अंगणवाडीच्या सर्व सदस्यां,कर्मचारी, पाल्य, ग्रामस्थ व चिमुकले, उपस्थित होते, तसेच लवकरच शासनाच्या वतीने अंगणवाडी आहारात योग्य प्रमाणात बदल होईल अशी माहिती येथे देण्यात आली.
