आसलगावच्या पीएम श्री शाळेत नवीन शाळा समिती गठित; अध्यक्षपदी सुभाष श्रीनाथ तर उपाध्यक्षपदी उज्वला दांडगे; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा समितीचा निर्धार...


 आसलगावच्या पीएम श्री शाळेत नवीन शाळा समिती गठित; अध्यक्षपदी सुभाष श्रीनाथ तर उपाध्यक्षपदी उज्वला दांडगे; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा समितीचा निर्धार...

जळगाव जामोद(प्रतिनिधी);

जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल आसलगाव येथे नवीन शाळा समितीची निवड उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. शाळेच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा देण्यासाठी गठित करण्यात आलेल्या या समितीच्या अध्यक्षपदी सुभाष श्रीनाथ, तर उपाध्यक्षपदी उज्वला दांडगे यांची निवड करण्यात आली.नवीन समितीच्या सदस्यपदी राजू वानखडे, संतोष भाकरे, जया दाते, साधना बोरकर, पुष्पा मोरे, योगिता अहिरे, रेखा गायकी, लता बोराखड आणि अर्चना इंदोरे यांची निवड करण्यात आली.यावेळी प्रकाश ढोकणे, दिलीप अकोटकर, भिकाजी वानखडे, श्रीकृष्ण भेलके, भगवान टापरे, सुनील डिवरे, गणेश गिरी आणि धीरज सावरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.नवीन समितीच्या माध्यमातून शाळेच्या विकासासाठी सकारात्मक आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करून शाळेचे आणि गावाचे नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करू, अशी भावना नवनिर्वाचित समितीच्या सदस्यांनी व्यक्त केली.शाळेतील शैक्षणिक वातावरण अधिक सक्षम करण्यासोबतच विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, विविध उपक्रमांना प्रोत्साहन देणे आणि शाळेच्या विकासाला गती देणे, यासाठी नवीन समिती महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे आगामी काळात समितीच्या माध्यमातून शाळेच्या विकासाला निश्चितच नवी दिशा मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.शाळा समिती गठित करण्यासाठी मुख्याध्यापक प्रेमसिंग राठोड, सुरेश भोपळे, अनिल भगत, अशोक आढाव, सुचिता जैन, शिल्पा जाधव, वैभव भगत, रवींद्र उगले, दीपक मोहड आणि विठ्ठल राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

Previous Post Next Post