नांदेड इंद्रजीतसिंग बावरी हत्या प्रकरणात SIT चौकशीची मागणी; MCOCA अंतर्गत कठोर कारवाईसाठी सरकारकडे निवेदन....

 

नांदेड इंद्रजीतसिंग बावरी हत्या प्रकरणात SIT चौकशीची मागणी; MCOCA अंतर्गत कठोर कारवाईसाठी सरकारकडे निवेदन....

संग्रामपूर/बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी... 

नांदेड येथील इंद्रजीतसिंग बावरी हत्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणाची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक अर्थात SIT स्थापन करावे, तसेच आरोपींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी ऑल सिख-सिकलीगर असोसिएशन (ASA)च्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.१४ ऑगस्ट २०२६ रोजी देण्यात आलेल्या या निवेदनाची प्रत तहसीलदार, तहसील कार्यालय संग्रामपूर यांच्यामार्फत शासनाकडे पाठवण्यात आली आहे. निवेदनावर ASAचे विदर्भ उपाध्यक्ष अनिलसिंग चव्हाण आणि बुलढाणा जिल्हाध्यक्ष किरणसिंग ह. बावरी यांच्यासह मिथुनसिंग बावरी, राजुसिंग बावरी,गुरुचरणसिंग चव्हाण,असलसीग डांगी,सुरजीतसिंग बाबर,नानकसिंग बावरी,चरणसिग चव्हाण,लाखनसिंग चव्हान ,दयालसिंग चव्हाण ,अवतारसिंग बाबर,रवींद्र सिंग चव्हाण, यशपालसिंग जुनी यांचेसह बहुसंख्य पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

नेमकं प्रकरण काय?निवेदनानुसार, ASAचे राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष बलजीतसिंग बावरी यांचे पुत्र स्वर्गीय इंद्रजीतसिंग बावरी यांची ८ ऑगस्ट २०२६ रोजी नांदेड येथील दूध डेअरी परिसरातील भरदिवसा खुळेआम पेट्रोल पंपाजवळ कथितरित्या हत्या झाली.या घटनेमुळे बावरी कुटुंबीयांसह समाजामध्ये तीव्र संताप आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

हत्या प्रकरणामध्ये पूर्वनियोजित कट, गुन्हेगारी टोळीची भूमिका किंवा इतर व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता असल्याचा संशय निवेदनातून व्यक्त करण्यात आला आहे.त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित सर्व बाबींची निष्पक्ष, सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक असल्याचे संघटनेने म्हटले आहे.ASAच्या प्रमुख मागण्या या प्रकरणात तातडीने विशेष तपास पथक — SIT स्थापन करून स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करावी.दोषी आरोपींविरुद्ध फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालविण्याची कार्यवाही करण्यात यावी आणि न्यायालयीन प्रक्रियेत प्रभावी पाठपुरावा करून दोषींना कठोर शिक्षा मिळण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत.निवेदनात पुढे म्हटले आहे की, कायदेशीर तरतुदी आणि आवश्यक निकष पूर्ण होत असल्यास संबंधित आरोपींविरुद्ध MCOCA अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.तसेच घटनेत सहभागी असलेल्या सर्व आरोपींविरुद्ध त्यांच्या भूमिकेनुसार BNS मधील कलम 3(5) सह इतर संबंधित कायदेशीर तरतुदींचा वापर करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याने महाराष्ट्र शासन आणि संबंधित प्रशासनाने संवेदनशीलतेने व तातडीने दखल घ्यावी, अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.इंद्रजीतसिंग बावरी यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा आणि या हत्या प्रकरणातील संपूर्ण सत्य समोर यावे, यासाठी संबंधित पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश द्यावेत, अशीही मागणी संघटनेने केली आहे.आता या निवेदनानंतर शासन आणि पोलीस प्रशासनाकडून SIT चौकशीबाबत काय निर्णय घेतला जातो, आरोपींवर कोणत्या कायदेशीर कलमांनुसार कारवाई होते आणि फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालविण्याबाबत पुढील पाऊल काय असते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post Next Post