जळगाव जामोद(प्रतिनिधी);
जळगाव जामोद येथे दिनांक 30 ऑगस्ट 2026 रोजी तेलीसमाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहामध्ये पार पडला कार्यक्रमाचे नियोजन अतिशय चांगल्या प्रकारे होते.समाजातील प्रत्येक विद्यार्थ्याला व्यासपीठ उपलब्ध होऊन योग्य मार्गदर्शन मिळावे व समाजातील लोकांनाच मानसन्मान मिळावा हा उदात्त हेतू ठेवून तेली समाज पंच मंडळ जळगाव जामोद व सर्व समाज बांधव यांच्या अथक परिश्रमामुळे मागील तेवीस वर्षापासून सदर कार्यक्रमाचे आयोजन होत असते असे आयोजकांनी सांगितले तसेच इतर सेवाभावी उपक्रम पंच मंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येतात सदर कार्य हे प्रेरणादायी असून समाजासमोर एक आदर्श आहे आपल्या सर्वांच्या कार्यामुळे सामाजिक एकता निर्माण होऊन एकमेका साह्य करू या भावनेतून समाजाची प्रगती निश्चितच होईल .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शरद गोमासे (सेवानिवृत्त शिक्षक )तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. आदित्य थोटांगे, जळगांव खान्देश ,दिपक तळे ,जळगांव जामोद, कृष्णा नायसे, पुणे, गणेश जामोदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सामाजिक कार्यकर्ते ओंकारराव बोराखडे आणि पंचफुलाबाई नथले यांना समाज रत्न पुरस्काराने सन्मानानित करण्यात आले. तेली समाजातील एकूण 34 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आले.यामध्ये इयत्ता 4 थी 6 विद्यार्थी,7व्या वर्गाचे 3 विद्यार्थी, वर्ग 10 वीचे 10 विध्यार्थी,वर्ग 12 वीचे 5 विद्यार्थी, आणि स्कॉलरशिप चे 6 विद्यार्थी बि. टेक 1,,आय टी आय 1,इंजिनियर 1, मेडिकल लेबटरी डिप्लोमा 1, यासर्वांना गौरविण्यात आले. प्रास्तविक तेली समाज पंच मंडळाचे सचिव श्यामभाऊ पांडव यांनी केले,यावेळी डॉ. आदित्य थोटांगे, दीपक तळे, कृष्णा नायसे, शरद गोमासे यांची समुचित भाषणे झाली.कार्यक्रमाचे संचालन संजय चोपडे तर आभार प्रदर्शन गणेश अरुडकार यांनीं केले. कार्यक्रमाच्या यशासाठी पंच मंडळाचे गणेश जामोदे ,राजेंद्र काथोटे,श्याम पांडव,नंदकिशोर काथोटे,संजय चोपडे,प्रा.रविंद्र खवणे, प्रदीप भागवत, संजय खेकाळे,सागर काचकुरे, मंगेश मंडवाले, प्रफुल्ल कावरे,शरद खवणे,गणेश अरुडकर,संतोष वेरुळकार, वैभव कावरे,तथा सर्व समाज बांधव, संताजी महिला मंडळ,संताजी युवा मंडळ यांनी परिश्रम घेतले.
