हिवरखेड मध्ये धार्मिक कार्यातून अनोखा उपक्रम.मंगळागौरी उद्यापनातून ‘हृदयग्रस्त अक्षय’च्या उपचारासाठी मदतीचा हात...


 हिवरखेड मध्ये धार्मिक कार्यातून अनोखा उपक्रम.मंगळागौरी उद्यापनातून ‘हृदयग्रस्त अक्षय’च्या उपचारासाठी मदतीचा हात...

अर्जुन खिरोडकार/हिवरखेड प्रतिनिधी... 

हिवरखेड येथे अनोखा उपक्रम महाराष्ट्रातील चिमुकला हृदय अक्षय दरेकर हा एस एम ए टॅप १ या दुर्मिळ आजाराशी झुंज देत असून याची ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्याच्या उपचारासाठी मोठ्या आर्थिक मदतीची आवश्यकता असून. त्याच्या उपचारासाठी महाराष्ट्रातील अनेक दानशूर व्यक्ती व सामाजिक संस्थांकडून मदतीचे प्रयत्न सुरू केले.याच सामाजिक बांधिलकीतून भुडके परिवारातील सौ. कीर्तीताई गौरव भुडके, हिवरखेड यांनी आपल्या मंगळागौरी व्रताच्या उद्यापन सोहळ्यानिमित्त एक अनोखा सामाजिक उपक्रम राबविला.उद्यापन सोहळ्यासाठी त्यांनी नातेवाईक व आप्तेष्टांना आमंत्रित केले होते. मात्र, निमंत्रण देतानाच “कार्यक्रमासाठी कोणत्याही प्रकारचा आहेर अथवा भेटवस्तू आणू नका; त्याऐवजी हृदयगस्त अक्षयच्या उपचारासाठी आपल्याला शक्य होईल तेवढी मदत करावी,” अशी विनवणी  केली.या आवाहनाला नातेवाईकांनीही सकारात्मक प्रतिसाद देत आपल्या परीने मदतीचा हात पुढे केला. धार्मिक कार्यक्रमाला सामाजिक संवेदनशीलतेची जोड देत ‘आहेर नको, मदतीचा हात द्या’ हा संदेश भुडके परिवाराने दिला.कीर्तीताई गौरव भुडके यांच्या या उपक्रमाचे उपस्थित नातेवाईकांकडून कौतुक करण्यात आले. एका चिमुकल्याच्या उपचारासाठी आपल्या आनंदाच्या प्रसंगातून मदतीचा वाटा उचलण्याचा हा प्रयत्न समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Previous Post Next Post