अर्जुन खिरोडकार/प्रतिनिधी हिवरखेड...
हिवरखेड येथील २७ ऑगस्ट रोजी झालेल्या नगर परिषदेच्या मासिक सभेमध्ये व्हिडिओ शूटिंग काढण्याच्या कारणावरून भाजपा व शिंदे सेनेच्या नगरसेवकांमध्ये हाणामारी झाली होती या घटनेनंतर आज शिंदे सेनेच्या चार नगरसेवकांसह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.27 ऑगस्ट रोजी नगर परिषदेची मासिक सभा घेण्यात आली होती या सभेमध्ये शिंदे सेनेच्या काही नगरसेवकांकडून व्हिडिओ शूटिंग काढण्यात आली याला उपसभापती अनिता वाकोडे व नगरसेवक दानिश खान यांनी अध्यक्षाची परवानगी नसल्यामुळे व्हिडिओ शूटिंग काढण्यास विरोध केला मात्रा त्या नगरसेवकांनी व्हिडिओ शूटिंग काढणे बंद न केल्यामुळे सभेचे अध्यक्ष व नगराध्यक्ष सुलभा रमेश दुतोंडे यांनी व्हिडिओ शूटिंग काढण्याची मी परवानगी दिलेली नसून आपण व्हिडिओ शूटिंग बंद करावी असे सांगितल्यावरही शिंदे सेनेच्या नगरसेवकांकडून शूटिंग काढणे बंद न झाल्यामुळे सभेत आरडाओरड झाली होती त्यामुळे काही काळ सभा थांबविण्यात येऊन परत नगराध्यक्ष यांच्या परवानगीने सभा सुरू करून संपवण्यात आले सभा संपल्यानंतर काही वेळातच नगर परिषदेच्या खाली भाजपा शिंदे सेनेच्या नगरसेवक व कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली या हाणामारीत भाजपाचे पाणीपुरवठा सभापती अजित खा जमीर खान व नगराध्यक्ष यांचे पुतणे विशाल कुलट हे जखमी झाले तर शिंदे सेनेचे रवी घुंगळ व ऋषिकेश पंचबुद्धे हे सुद्धा जखमी झाले होते या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले त्या अनुषंगाने आज प्रथम शिंदे सेनेकडून कडून नगरसेवक रवी घुंगळ यांच्या फिर्यादीवरून आरोपी विशाल कुलट, आकाश दुतोंडे, सागर दुतोंडे, गणेश दुतोंडे, मंगेश दुतोंडे, योगेश दुतोंडे, रमेश दुतोंडे,प्रफुल पाचपोर, इकबाल खान इजराइल खान यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 118 (1), 115 (2), 189 (2), 191, 351(2), 352, 135, 3 (5) कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले तर नगरपरिषद नगराध्यक्ष सुलभा रमेश दुतोंडे यांच्या फिर्यादीवरून नगरसेवक रवी घुंगळ, ऋषिकेश पंचबुद्धे, रामेश्वर हागे, श्यामशील भोपळे या चार नगरसेवकांसह गोपाल घुंगळ, अक्षय तिजारे, सागर ताळे, महादेव भड, गौरव भुडके, कृष्णा धुळे, शशिकांत शेंडे, राजेश परनाठे, गुलाब परनाठे अश्या 13 आरोपींविरुद्ध कलम 118 (1), 115 (2), 189 (2), 190, 352, 135 कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे हिवरखेड येथील राजकीय वातावरण तापले असून आता पुढे पोलीस विभागाकडून काय कारवाई केली जाते याकडे हिवरखेड वासियांचे लक्ष लागले आहे.
या मारहाणीत रवी घुंगळ, माजी मुख्याध्यापक श्यामशील भोपळे, ऋषिकेश पंचबुद्धे व रामेश्वर हागे या चारहि शिंदे सेनेच्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल झाले असून यामध्ये भाजपाचे विस्तारक रमेश दुतोंडे यांच्या विरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल झाला आहे,
या घटनेने हिवरखेड हिवरखेड मध्ये तणाव पूर्ण शांतता निर्माण असून या हाणामारीच्या घटनेचा तपास हिवरखेड ठाणेदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय कायदे पोलिस करीत आहेत
