श्री कालभैरव कावड यात्रेचे बुलढाणा शहरात उत्साहात आगमन; नगराध्यक्ष पूजाताई संजय गायकवाड यांचे हस्ते भव्य महाआरती संपन्न..!


 श्री कालभैरव कावड यात्रेचे बुलढाणा शहरात उत्साहात आगमन; नगराध्यक्ष पूजाताई संजय गायकवाड यांचे हस्ते भव्य महाआरती संपन्न..!

बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी...

श्रावण सोमवारच्या पवित्र पर्वानिमित्त श्री क्षेत्र बुधनेश्वर महादेव संस्थान ते श्री जुनागाव हनुमान मंदिर संस्थान असा भक्तिमय प्रवास करत आर.आर. ग्रुपच्या वतीने आयोजित श्री कालभैरव कावड यात्रेचे बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौक येथे उत्साहात आगमन झाले. ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.कावड यात्रेचे आगमन झाल्यानंतर श्री कालभैरव कावडीचे मनोभावे दर्शन घेतले. यानंतर नगराध्यक्ष पूजाताई संजय गायकवाड यांच्यासोबत धर्मवीर युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड यांनी श्री कालभैरव कावडीची विधिवत पूजा-अर्चना व भव्य महाआरती संपन्न झाली. यावेळी उपस्थित शेकडो शिवभक्तांसोबत भक्तिभावाने सहभागी होत कावडधारी शिवभक्तांचा उत्साह अनुभवला.

ढोल-ताशांच्या गजरात कावडधारी शिवभक्तांसोबत उत्स्फूर्तपणे सहभागी होत नृत्याचा आनंद घेतला. शिवभक्तांचा उत्साह, श्रद्धा आणि भक्तिभाव पाहून मनापासून आनंद झाला. श्री कालभैरव कावड यात्रा ही श्रद्धा, भक्ती, सामाजिक एकोपा आणि सामूहिक सहभागाची सुंदर परंपरा जपणारी यात्रा आहे.यावेळी नगराध्यक्ष पूजाताई संजय गायकवाड, धर्मवीर युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख आशिष जाधव, युवासेना शहरप्रमुख श्रीकांत गायकवाड, मल्हारी गायकवाड, नगरसेवक सचिन गायकवाड यांच्यासह श्री कालभैरव कावड यात्रेचे सर्व सन्माननीय सदस्य, आर.आर. ग्रुपचे पदाधिकारी व सदस्य, कावडधारी शिवभक्त, नागरिक, माता-भगिनी आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post