अर्जुन खिरोडकार/हिवरखेड (प्रतिनिधी);
हिवरखेड येथील पोलिस कर्मचारी धीरज साबळे हे ट्रॅफिक पोलिसचे दिनांक १५ ऑगस्टच्या दुपारी कार्य बजावत असताना, त्यांनी एका बजाज प्लेंटिना मोटर सायकल स्वराला हेल्मेट व गाडीचे कागद पत्रे बाबत अशी विचारणा केली असता, त्या इसमाने सरळ ट्रॅफिक पोलिस कर्मचारी यांच्याशी हुंदत घातली , तुम्ही आम्हाला का त्रास देत आहात, तुम्ही सर्व पोलिस मादरचोद भाडंखाऊ आहात, तुम्ही पण याच्या पैकीच हा या असील भाषांत शिवीगाळ करून चिडून पोलिस कर्मचाऱ्याला गालाला चावा घेतला, यावरून सदर पोलिस कर्मचारी धीरज साबळे यांनी तत्काळ इतर पोलिस कर्मचारी यांची मदत घेऊन सदर इसमाला ताब्यात घेतले व आपली फिर्याद नोंदून आरोपी दीपक रामकृष्ण चोंडेकर रा हिवरखेड यांच्या विरुद्ध कलम १२१(१) १३२,२९६, बी एन एसह कलम १३०(१) १७७,१२९,१९४ (डी) मोवाका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला, सदर घटनेचा तपास पीएसआय गोपाल गिलबिले हे करीत आहेत,
काय म्हणता सुज्ञ नागरिक,
पोलिस कर्मचारी व सदर गुन्ह्यातील युवक या दोघांचा हा वाद भर चौकात भर दुपारी झाला,
आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितला
आम्हाला प्रश्नन पडला वर्दीतल्या पोलिसावर एक सामान्य माणूस हा हात का उचलतो
पोलीसांचा वचक कमी पडला का?
किंवा सदर आरोपी दारू पिलेला सुद्धा दिसत होता, मग स्वातंत्र्य दिनी तर दारूची दुकाने बंद असतात मंग हा दारू कुठून पेला असे आगळे वेगळे प्रश्र्न प्रत्यक्ष दर्शकांनि आपल्या चर्चेतून निर्माण केले व याबाबत वरिष्ठांनी सखोल चौकशी करून दारूमुक्त परिसर करावा अशी मागणी केली,आज नसेडी लोकांन पासून पोलिस सुरक्षित नाही तर सामान्य जनता काय असणार असा सुद्धा गंभीर आरोप उपस्थित नागरिकांनी केला,
