मंगल काकडे/पिंपळगाव काळे
श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या ६५० व्या जयंतीनिमित्त आयोजित समरस यात्रेच्या कलशाचे नांदुरा येथे मा. आमदार चैनसुख संचेती व भारतीय जनता पार्टीचे खामगाव जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.या समरस पवित्र यात्रेच्या कलशाचे जळगाव जामोद ग्रामीणच्या वतीने पिंपळगाव काळे येथे दिनांक १६/८/२०२६ संध्याकाळी ठिक ७.३० मीनिटानी संत रविदास महाराज जयंतीचे आयोजन समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले होते. जयंतीचे औचित्य साधून पिंपळगाव काळे येथे आणून संत रविदास महाराज मंदिरामध्ये समरस यात्रेच्या कलशाचे विधिवत स्वागत समाज बांधवांच्या वतीने व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मध्ये स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष संजय पांडव यांनी संत रविदास महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या समता,बंधुता आणि सामाजिक एकतेच्या विचारांचे महत्व सांगितले.संत रविदास महाराजांनी दिलेला मानवतेचा आणि समतेचा संदेश समाजाने आचरणात आणावा असे आवाहन त्यांनी यावेळी स्थानिक चर्मकार समाज बांधवांना केले.मन चंगा तो कठौती में गंगा या संत रविदास महाराजांच्या विचारातुन अंत:करणाची शुद्धता, समता आणि मानवतेचा संदेश मिळेतो त्यांच्या विचारांनी समाजात सामाजिक ऐक्य व बंधुभाव अधिक दृढ होवो,हीच या पवित्र प्रसंगी चर्मकार समाज बांधवांच्या वतीने प्रार्थना करण्यात आली.यावेळी माजी जिल्हा परिषद विरोध पक्षनेते बंडू पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष संजय पांडव, सुभाष काकडे, सुधाकर राऊत,गणेश खवले,अरुण पाटील, तालुका कार्यकारिणी सदस्य, ग्राम शाखाध्यक्ष गणेश खवले, रमेश चिम, दिनेश पिंजरकार,दिलीप काकडे,श्रीराम पिंजरकार,प्रसाद काकडे,मंगेश चिम,सोपान जळके, शुभम काकडे, प्रेमनाथ काकडे, रवी कस्तुरे यांच्यासह स्थानिक चर्मकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.व शेवटी संत शिरोमणी रविदास महाराज की जय या नावाचा जयघोष सर्व उपस्थितांनच्या वतीने करण्यात आला.
