प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी...
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे हिवरखेड सर्कल अध्यक्ष,स्थानिक दिव्यांग युवा पत्रकार,मनोज रमेशराव भगत यांना लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचा २०२६ चा"लोकस्वातंत्र्य प्रभावी पत्रकारिता गौरव"हा सन्मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार नुकताच अकोला येथील जैन रेस्ट्रो सभागृहात प्रदान करण्यात आला . या वेळी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख,शिवसेना ज्येष्ठ नेते व अकोल्याचे माजी उपमहापोर श्रीरंगदादा पिंजरकर,देविदास म्हैसने,श्यामबापू देशमुख,योगेश अग्रवाल,साहेबराव तायडे, प्रदीप खाडे आधी मान्यवरांच्या हस्ते मनोज भगत यांचा हा पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला . मनोज भगत हे दिव्यांग बेरोजगार संघटना तेल्हारा तालुका अध्यक्ष असून हिवरखेड प्रेस क्लब चे सदस्य आहेत. सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणारं हे एक संवेदनशील व्यक्तिमत्व असून हिवरखेड सर्कलमधील जनसमस्यांना वाचा फोडणारे पत्रकार व समाजसेवक म्हणून त्यांचा परिचय आहे. त्यांना पुरस्काराच्या या प्राप्त राज्यस्तरीय बहूमाना बद्दल त्यांचे विविध संघटना पदाधिकारी व चाहत्याकडून अभिनंदन होत आहे.
