जळगाव जामोद येथे प्रथमच इस्कॉनतर्फे भव्य श्रीकृष्ण जन्मोत्सव....


 जळगाव जामोद येथे प्रथमच इस्कॉनतर्फे भव्य श्रीकृष्ण जन्मोत्सव....

जळगाव जामोद(प्रतिनिधी);

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (ISKCON) यांच्या वतीने जळगाव जामोद शहरात प्रथमच भव्य श्रीकृष्ण जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत हा धार्मिक व सांस्कृतिक सोहळा पार पडणार आहे.श्री संत जलाराम बाबा मंदिर, सांस्कृतिक भवनाजवळ, जळगाव जामोद येथे आयोजित या महोत्सवात मधुर हरिनाम संकीर्तन व भजन, ओडिसी स्वागत नृत्य, बाल गोपाल अभिषेक, श्रीकृष्ण जन्मकथा तसेच ५६ भोग अर्पण व पालना महाआरती संकीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. महोत्सवानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी विश्वविख्यात भागवत प्रवक्ता श्रीमान अनंतशेष प्रभुजी यांची प्रमुख प्रवक्ते म्हणून उपस्थिती राहणार आहे. ते विदर्भ-अमरावती क्षेत्रीय झोनल सुपरवायझर म्हणूनही कार्यरत आहेत.जळगाव जामोद शहरात प्रथमच होत असलेल्या या श्रीकृष्ण जन्मोत्सवात नागरिकांनी व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.या कार्यक्रमास माजी कॅबिनेट मंत्री व आमदार, जळगाव जामोद डॉ. संजयजी कुटे यांची उपस्थिती लाभणार आहे.“हरे कृष्ण, हरे कृष्ण… कृष्ण कृष्ण, हरे हरे!” या भक्तिमय वातावरणात जळगाव जामोद शहरात श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा भव्य सोहळा रंगणार आहे. तरी शहरातील भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा.

Previous Post Next Post