पोपटखेड धरणात ३२ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला; एकलव्य बचाव पथकाने शोधून काढला.पाण्यातून मृतदेह बाहेर काढत पोलिसांच्या ताब्यात; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट...
राजु भास्करे/अकोला जिल्हा प्रतिनिधी...
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेला गाव पोपटखेड या गावाला लागुन पठार तलाव असुन या तलावात एका ३२ वर्षीय युवकाचा मृतदेह दि.१२/९/२०२६ला ठिक ५:३०वाजता आढळून आला . मृत्यू देह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दि.१३/९/२०२६ रविवारी एकलव्य बचाव पथकाचे अध्यक्ष पाडुरंग तायडे यांनी शोधमोहीम राबवत तलावत असलेला मृतदेह ठिक १२:३० वाजता पाण्याच्या बाहेर काढले आहे.तसेच मृत युवकाची ओळख पटली असून मृत्यू युवक देवर्डा येथील अक्षय विश्वराव अरबट (३२) अशी पटली आहे.तसेच घटनेची माहिती मिळताच अकोट ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. युवकाचा मृत्यू अपघाती बुडून झाला की यामागे अन्य काही कारण आहे, याचा तपास आकोट पोलिसांकडून केला जात आहे.
