भक्तिमय वातावरणात आ. डॉ. संजय कुटे यांच्या निवासस्थानी श्री गणरायाची विधिवत स्थापना...


 भक्तिमय वातावरणात आ. डॉ. संजय कुटे यांच्या निवासस्थानी श्री गणरायाची विधिवत स्थापना...

जळगाव जामोद(प्रतिनिधी): 

गणरायाच्या आगमनाचा आणि स्थापनेचा पवित्र क्षण म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि आनंदाचा सुंदर संगम. याच भक्तिमय वातावरणात जळगाव जामोद येथील भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा आमदार डॉ. संजय कुटे यांच्या निवासस्थानी श्री गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. आ. डॉ. संजय कुटे व डॉ. अपर्णाताई कुटे यांनी पारंपरिक पद्धतीने श्री गणरायाचे पूजन करून आरती केली.यावेळी संपूर्ण परिसरात मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि सर्वांगीण प्रगतीसाठी प्रार्थना करण्यात आली. विघ्नहर्त्या श्री गणेशाच्या आगमनाने घराघरात आनंद, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार झाला आहे.बाप्पाच्या आशीर्वादाने सर्वांच्या जीवनातील विघ्ने दूर होवोत, प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण होवोत आणि सर्वांच्या जीवनात सुख, समाधान व समृद्धी नांदो, अशी प्रार्थना आ. डॉ. संजय कुटे यांनी यावेळी श्री गणरायाच्या चरणी केली.गणरायाच्या आगमनानिमित्त कुटे निवासस्थानी भक्तीमय वातावरण अनुभवायला मिळाले. या पवित्र सोहळ्याने गणेशोत्सवाच्या उत्साहाला प्रारंभ झाला.

Previous Post Next Post