प्रिया सचिन हागे यांची भाजपा महिला मोर्चा जळगाव जामोद तालुकाध्यक्षपदी निवड...


प्रिया सचिन हागे यांची भाजपा महिला मोर्चा जळगाव जामोद तालुकाध्यक्षपदी निवड...

जळगाव जामोद(प्रतिनिधी);

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या जळगाव जामोद तालुकाध्यक्षपदी जामोद येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. प्रिया सचिन हागे यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.प्रिया हागे या भाजपा सोशल मीडिया प्रमुख म्हणून सक्रिय असून, ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, ऑनलाईन फॉर्म, बँकिंग सुविधा विषयी मार्गदर्शन यासाठी त्या नेहमी अग्रेसर असतात. शासनाच्या राज्य समितीवर मानद कल्याण पशु अधिकारी म्हणूनही त्यांनी सेवा बजावली असून त्यांची सर्वपरिचित ओळख आहे.ही नियुक्ती जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते तथा माजी मंत्री आ. डॉ. संजय कुटे व अपर्णाताई कुटे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष सचिनबापू देशमुख तसेच भाजपा पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.नवनियुक्त पदाधिकारी प्रिया हागे यांनी सांगितले की, सासरच्या परिवाराकडून मिळालेला गोसेवेचा पवित्र वसा शेवटच्या श्वासापर्यंत अविरतपणे चालू ठेवणार असून, ग्रामीण भागातील आदिवासी व गरजू मुलांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. त्यांच्या निवडीमुळे जळगाव जामोद तालुक्यातील भाजपा महिला आघाडीच्या कार्याला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Previous Post Next Post