सय्यद शकिल/अकोट तालुका प्रतिनिधी..
मोहाळा येथे गणपती विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात,श्रद्धेने आणि अत्यंत शांततेत पार पडला. मिरवणुकीत गावातील नागरिक, भाविक, युवक आणि गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ढोल-ताशांचा गजर आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने संपूर्ण मोहाळा परिसर दुमदुमून गेला.सायंकाळच्या सुमारास पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेशमूर्तींची मिरवणूक काढण्यात आली. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. अनेक भाविकांच्या डोळ्यांत बाप्पाला निरोप देताना भावुकता दिसून आली.विसर्जन सोहळा शांततेत आणि सुरळीत पार पडावा यासाठी अकोट ग्रामीणचे ठाणेदार श्रीधर गुठठे,सचिन कुलट आणि पोलिस यंत्रणेच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती.हा सोहळा यशस्वी करण्यासाठी गणेश मंडळाचे अध्यक्ष अमोल वानखडे, उपाध्यक्ष जयेश आखरे, प्रणव वानखडे, स्वराज आवटे, गणेश चव्हाण, राहुल नेरकर, सर्वेश जूनगरे, चेतन जूनगरे, दिनेश बोरोडे, ग्रामपंचायत उपसरपंच इमरान पटेल, समाजसेवक अन्सार मामू, जमीर खाँ, मुश्ताक पटेल, योगेश वानखडे, सुरेश आवटे,अमोल जूनगरे .विशाल वानखडे. राहुल बोरोडे,आशिष भगत आणि सर्व ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले.सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे दर्शन घडवत कोणताही अनुचित प्रकार न घडता हा सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.
