हिवरखेड प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे तात्काळ भरा!फार्मसी परिचरांसह रिक्त पदे भरण्याची मागणी; प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्याचीही रुग्णांची मागणी,


 हिवरखेड प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे तात्काळ भरा!फार्मसी परिचरांसह रिक्त पदे भरण्याची मागणी; प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्याचीही  रुग्णांची मागणी,  

अर्जुन खिरोडकार/हिवरखेड प्रतिनिधी...

हिवरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये फार्मसी परिचरांसह रिक्त असलेली पदे तात्काळ भरण्यात यावीत, अशी मागणी नागरिकांकडून रूग्णांनकडून होत आहे. रिक्त पदांमुळे आरोग्य केंद्रातील दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असून, याबाबत वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.आरोग्य केंद्रात आवश्यक गोळ्या व औषधांचा पुरवठा होत असला तरी नागरिकांना अपेक्षित असलेल्या आधुनिक व मोठ्या आरोग्य सुविधांचा अभाव असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. हिवरखेड परिसरातील वाढती लोकसंख्या आणि रुग्णांची संख्या लक्षात घेता आरोग्य सुविधांचा विस्तार करण्याची गरज निर्माण झाली आहे.त्यामुळे शासनाने हिवरखेडच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा ग्रामीण रुग्णालयात दर्जावाढ करून आवश्यक मनुष्यबळ, तज्ज्ञ डॉक्टर, आधुनिक वैद्यकीय उपकरणे व इतर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.रिक्त पदे तात्काळ भरून आरोग्य केंद्राचा दर्जा वाढविण्याबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा हिवरखेडकरांकडून व्यक्त होत आहे.

Previous Post Next Post