हिवरखेड पोलीस स्टेशनच्या वतीने लाडक्या बाप्पाला गुलालाच्या सुगंधात निरोप..!पारंपारिक बँडच्या तालावर पोलिसांचा उत्साह; महाप्रसादाने विसर्जन सोहळा संपन्न...


 हिवरखेड पोलीस स्टेशनच्या वतीने लाडक्या बाप्पाला गुलालाच्या  सुगंधात निरोप..!पारंपारिक बँडच्या तालावर पोलिसांचा उत्साह; महाप्रसादाने विसर्जन सोहळा संपन्न...

अर्जुन खिरोडकार/हिवरखेड(प्रतिनिधी);

हिवरखेड पोलीस स्टेशनच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या लाडक्या गणरायाला मोठ्या भक्तीभावात आणि पारंपारिक पद्धतीने निरोप देण्यात आला.गणेशोत्सव काळात हिवरखेड सह आजूबाजूच्या सर्व खेडे-पाड्यातील गणेश मंडळांना विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. सर्व गणेश मंडळांच्या मिरवणुका शांततेत आणि कुठलाही अनुचित प्रकार न घडता पार पडल्यानंतर, शेवटी आपल्या पोलीस स्टेशनच्या बाप्पाला निरोप देण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी पोलीस स्टेशन आवारात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर पारंपारिक बँड पार्टीच्या तालावर वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात पोलिसांनी स्वतः ठेका धरत गुलालाची उधळण करत गणरायाला निरोप दिला. पोलीस कर्मचारी बँडच्या तालावर थिरकल्याचे मनोहारी दृश्य यावेळी पाहायला मिळाले.पोलीस स्टेशनचा बाप्पा हा सर्वांसाठी श्रद्धेचा विषय असून, शांततेत उत्सव पार पडल्याबद्दल पोलिसांनी गणरायाचे आभार मानत पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत निरोप दिला. यावेळी ठाणेदार ,पोलिस कर्मचारी, गृहरक्षक उपस्थित होते,

Previous Post Next Post