रानभाज्यांच्या माध्यमातून पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा जागर; ‘वनश्री २०२६’ महोत्सव उत्साहात...


 रानभाज्यांच्या माध्यमातून पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा जागर; ‘वनश्री २०२६’ महोत्सव उत्साहात...

जळगाव जामोद(प्रतिनिधी): 

सहकार विद्या मंदिर येथे ‘वनश्री २०२६ : खाद्य संस्कृती महोत्सवा’चे उत्साहात आयोजन करण्यात आले. रानभाज्यांची ओळख, त्यांचे पौष्टिक महत्त्व, स्थानिक जैवविविधतेचे संवर्धन आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हा महोत्सवाचा उद्देश होता.महोत्सवाचे उद्घाटन तरुणाई फाउंडेशनद्वारे संचालित सालईबनचे सर्वेसर्वा मनजीत सिंग यांच्या हस्ते झाले.अध्यक्षस्थानी बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. किशोर केला होते. मुख्य संयोजिका डॉ. स्वाती केला, प्राचार्य विनायकजी उमाळे, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य विनोद ईश्वरे, प्राचार्य राजेश लोहिया, पर्यवेक्षिका अरुणा व्यवहारे व मनीषा म्हसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.महोत्सवात चिमुकल्या विद्यार्थ्यांची ‘रानभाजी वेशभूषा स्पर्धा’, इयत्ता सहावी-सातवीच्या विद्यार्थ्यांचे ‘निसर्गधन दालन’, तसेच विविध रानभाज्यांच्या पदार्थांचे स्टॉल विशेष आकर्षण ठरले. शेवग्याचे व फांजीच्या पालाचे पराठे, अंबाडीची भाजी व चटणी, अंबाडीची भाकरी, बांबूच्या बत्तुशांची भाजी, अळूच्या वड्या आदी पारंपरिक पदार्थांची मांडणी करण्यात आली.इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींचा ‘मिरची-भाजी व भाकर’ स्टॉल, ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींचा कळण्याची, ज्वारीची व बाजरीची भाकर, अंबाडीची भाजी-चटणी असलेला स्टॉल तसेच नववीच्या विद्यार्थिनी व स्कूल कॅबिनेट मिनिस्टर्सचा ‘रानमेवा’ स्टॉल लक्षवेधी ठरला. विद्यार्थ्यांनी पदार्थांची विक्रीही केली. त्यामुळे त्यांना व्यवहारज्ञान, आर्थिक नियोजन, नेतृत्व व उद्योजकतेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी योगेश घुटे सर, साकेत गिरजापुरे सर व विज्ञान शिक्षक नितीन बेंदरकर सर यांनी सांभाळली. अश्विनी भोजने मॅडम यांनी सूत्रसंचालन केले. उजाला राऊत मॅडम यांनी प्रास्ताविक केले, तर अस्वार मॅडम यांनी आभार मानले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Previous Post Next Post