"माऊली मल्टीस्टेट ने केलेल्या कोट्यावधीच्या फसवणूक प्रकरणी एस आय टी स्थापन करा..हिवरखेड विकास मंच आणि पत्रकार संघाचे पोलीस अधीक्षकांना साकडे...


 "माऊली मल्टीस्टेट ने केलेल्या कोट्यावधीच्या फसवणूक प्रकरणी एस आय टी स्थापन करा..हिवरखेड विकास मंच आणि पत्रकार संघाचे पोलीस अधीक्षकांना साकडे...

अर्जुन खिरोडकार/हिवरखेड...

 हिवरखेड येथे माऊली मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी च्या माध्यमातून ठेवीदारांची कोट्यावधी लोकांनी आर्थिक फसवणूक झाली असून चेअरमन सुनील सरोदे आणि त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध अद्यापही गुन्हे दाखल न झाल्यामुळे  हे प्रकरण तापले असून हिवरखेड विकास मंच, पत्रकार संघ आणि ठेवीदारांनी थेट पोलीस अधीक्षकांकडे या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली आहे..सविस्तर असे की माऊली मल्टिस्टेट को- ऑप. क्रेडिट सोसायटी लि.( रजी न.MSCS/CR/681212 )  नाशिक 422001 च्या हिवरखेड तेल्हारा सह विविध शाखेचे हजारो खाते धारक असून अल्पबचत, बचत, मुदत ठेवीदार सुद्धा आहेत. शेकडो ठेवीदारांच्या मुदत ठेवीची देय मुदत संपल्यावरही आणि शाखेत अनेकदा मागणी करूनही  ठेवीची व्याजा सह रक्कम आणि आता पर्यन्त चे वाढीव व्याज ग्राहकांना परत मिळाले नाही. मागील अनेक महिन्यांपासून संस्थेतील सर्व अधिकारी कर्मचारी आणि स्थानिक संचालक मंडळ तसेच चेयरमन हे फक्त उडवा उडवीची उत्तरे देत आहेत आणि तारीख पे तारीख देत आहेत परंतु एक रुपया सुद्धा ठेवीदारांना  परत करीत नाही. हिवरखेड येथील  शाखा सुद्धा कधी चालू तर जास्त करून बंद असून चेअरमन सुनील सरोदे, CEO निकेत धोटे, शाखा व्यवस्थापक ओमप्रकाश रामदास चतुरकार, मिलिंद निवृत्ती गावंडे, आणि स्थानिक तथा वरिष्ठ  संचालक मंडळ तसेच बँकेचे सर्व अधिकारी कर्मचारी पैसे देत नाहीत. त्यामुळे संबंधितांनी संगनमत करून  शेकडो ग्राहकांची मिळून एकूण कोट्यावधी रुपयांनी आर्थिक फसवणूक केली आहे.. त्यामुळे ठेवीदारांचे पैसे व्याजासह परत करावे, आणि ह्या फसवणुकीमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असणाऱ्या सर्व दोषी विरुद्ध फौजदारी कारवाई करावी. तसेच या प्रकरणातील घोटाळा करणारे आरोपी विदेशात पळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या प्रकरणाच्या तपासासाठी तात्काळ विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटी गठीत करावी आणि या प्रकरणाचा जलद गतीने तपास करून संबंधित आरोपीचे पासपोर्ट जप्ती करणे तसेच संस्थेचे चेअरमन, सीईओ सोबतच संचालक मंडळ आणि सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या प्रॉपर्टी जप्त करून  सर्व ठेवीदारांचे पैसे परत करण्यात यावे अशी मागणी सुद्धा ठेवीदार करीत आहेत. हिवरखेड येथे अकोल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, सहाय्यक पोलीस अधीक्षक निखिल पाटील आले असता हिवरखेड  विकास मंच, पत्रकार संघ, आणि अनेक ठेवीदारांनी या प्रकरणाचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून दिले आणि तात्काळ एसआयटी गठीत करण्याची मागणी केली आणि निवेदन दिले. निवेदनावर धिरज संतोष बजाज, गणेश सुरजुसे, अर्जुन खिरोडकार, बाळासाहेब नेरकर, जमीर शेख, राजू खान यांच्यासह अनेक मान्यवरांच्या सह्या आहेत.या विषयावर उत्तर देताना अप्पर पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी दोषींवर लवकरच गुन्हे दाखल होतील असे आश्वासन दिले.

Previous Post Next Post