जळगाव जामोद(प्रतिनिधी);
शैक्षणिक सत्र २०२६, २७ यावर्षी दरवर्षीप्रमाणे इतिहास अभ्यास मंडळाची कार्यकारणी गठीत करून उद्घाटन सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गिरीश मायी तर प्रमुख उपस्थिती म्हणून जळगाव शिक्षण मंडळाचे सहसचिव मिलिंद जोशी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बी.एस पटेल महाविद्यालयाचे प्रा. अतुल उगले, मंचावर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यकारी अधिकारी प्रा. अर्चना जोशी मॅडम यांची प्रमुख उपस्थितीत होती. कार्यक्रमाची सुरुवात अक्षरा राऊत तिच्या स्वागत गीताने झाली. आणि दीप प्रज्वलन व पूजन करून झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र.इतिहास विभाग प्रमुख डॉ.गोपाल नामदेवराव भड यांनी केले. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनात्मक दृष्टिकोन वाढावा तसेच सभोवतालच्या ऐतिहासिक वारसा स्थळांची माहिती असावी,त्यासंदर्भात देखील नव्याने इतिहास लेखन विद्यार्थ्यांनी करावे, गतकाळातील अनेक घटना नव्याने तथात्मक दृष्टीने लेखन करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन केले तसेच कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक प्रा. अतुल उगले सर यांनी विद्यार्थ्यांची कार्यकारणी घोषित करून विद्यार्थ्यांना सभोवतालच्या ऐतिहासिक वास्तू, किल्ले, भवन सारख्या ऐतिहासिक स्थळाविषयी माहिती देऊन त्यांनी परिसराततीलच मैलगडच्या याविषयी तसेच भोन येथील उत्खननातून नव्याने उजेडात आलेल्या तथ्यात्मक इतिहासाविषयी विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. भोन हे वाकाटक कालीन असल्याचा उल्लेखही केला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मिलिंद जोशी सर यांनी ऐतिहासिक घटनांची सत्यता पडताळून पाहून पुराव्याच्या आधारे इतिहासाचे पुनरलेखन होणे ही काळाची गरज आहे. इतिहासाचा अभ्यास हा व्यक्तिनिष्ठ नसून वस्तुनिष्ठ असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. अध्यक्ष भाषणामध्ये डॉ गिरीश मायी यांनी इतिहास मंडळाच्या कार्यकारिणीला शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांनी भूतकाळातील घटना ह्या कशा वर्तमान काळात मार्गदर्शक ठरतात याविषयी माहिती दिली.तसेच स्वच्छ भारत सुंदर भारत ह्या विचाराची विद्यार्थ्यांमध्ये गरज आहे आणि म्हणून त्यांनी महाविद्यालयाचा परिसरा बरोबरच आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा हा महत्वपूर्ण संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया वानखेडे हिने केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मंडळाच्या अध्यक्ष रेणुका दंडे हिने केले कार्यक्रमासाठी प्रा. बावस्कर, प्राध्यापक उनटकाट, प्रा. सायखेडे, प्रा.निलजे, प्रा. उमरकर, प्रा नागरे, प्रा मुंडे,प्रा जोशी इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाधान निलजे आणि विशेष परिश्रम घेतले.
