पवन महाराज उंबरकार राज्यस्तरीय महाराष्ट्र गुणगौरव पुरस्काराने सन्मानीत...


 पवन महाराज उंबरकार राज्यस्तरीय महाराष्ट्र गुणगौरव पुरस्काराने सन्मानीत...

अर्जुन खिरोडकार/हिवरखेड प्रतिनिधी...

हिवरखेड येथील पवन महाराज यांना महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले.दि.06/09/2026 होजी शिर्डी येथे बी, दि. चेंज फाऊंडेशन आयोजीत राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 2026 मोठ्या उत्साहात संपन्न झाला.ह्या भव्य सोहळ्या मध्ये "महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार 2026"  "सौंदर्य कला पुरस्कार" व "आदर्श शिक्षक पुरस्कार" या तीन मानाच्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.महाराष्ट्रातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला असुन यामध्ये अकोला जिल्हयातील हिवरखेड येथील हरहुन्नरी कलाकार पवन महाराज उंबरकार यांना महाराष्ट्र गुणगौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.पवन महाराजांच्या कर्तुत्वाचा, मेहनतीचा आणि कलेचा सन्मान म्हणजे हिवरखेड वासीयांसाठी अभिमानाची बाब आहे. तुमच्या हातुन भविष्यातही असेच उत्तुंग कार्य घडत राहो आणि तुमच्या यशाची उंची दिवसेंदिवस वाढत जावो. अश्या शुभेच्छा हिवरखेड वासीयांतर्फे त्यांना दिल्या जात आहेत.

Previous Post Next Post