शिक्षक दिनी विद्यार्थ्यांच्या हाती महाविद्यालयाचा कारभार!त्रिमूर्ती महाविद्यालयात ‘स्वयंशासन दिन’;


 शिक्षक दिनी विद्यार्थ्यांच्या हाती महाविद्यालयाचा कारभार!त्रिमूर्ती महाविद्यालयात ‘स्वयंशासन दिन’;

जळगाव जामोद (प्रतिनिधी) : 

थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून देशभर साजरा केला जात असताना, त्रिमूर्ती कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, आसलगाव बाजार येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) युनिटच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून ‘स्वयंशासन दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयीन प्रशासनाचा अनुभव देण्यात आला.शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, वक्तशीरपणा, नेतृत्वगुण, निर्णयक्षमता आणि जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने लोकशाही पद्धतीने विद्यार्थ्यांची विविध पदांवर निवड करण्यात आली. यामध्ये विशाखा सुनील बोदडे हिने प्राचार्यपदाची, तर  प्राची मेळे हिने उपप्राचार्यपदाची जबाबदारी स्वीकारली.राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भूमिका अत्यंत उत्साहाने आणि जबाबदारीने पार पाडल्या.भक्ती वाघमारे,किरण कोकाटे,वैष्णवी झाल्टे,खुशी वाघोदे,प्रगती उमाळे,जागृती घोडे, सायली ससाने, नंदिनी पाखरे, वैष्णवी भोंबळे, वैभव कुमार आणि ऋषिकेश वसतकार यांनी शिक्षकांची भूमिका प्रभावीपणे बजावली.

तर साई धाबे यांनी कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यभार सांभाळला. राहुल बोंद्रे व संघदीप जवंजाळ यांनी शिपाई म्हणून महाविद्यालयीन कामकाजाची जबाबदारी पार पाडली.डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्वयंशासन दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.दिवसभर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील विविध प्रशासकीय व शैक्षणिक कामकाजात सक्रिय सहभाग घेतला. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.“विद्यार्थ्यांनी मनात कोणतीही भीती न बाळगता पुढे आले पाहिजे. अशा उपक्रमातूनच त्यांच्यातील नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास विकसित होतो,” असे मत विद्या काटले यांनी व्यक्त केले.विद्यार्थ्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भूमिका पार पाडत दिवसभराचे महाविद्यालयीन कामकाज यशस्वीपणे हाताळले. या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना जबाबदारी, नेतृत्व आणि प्रशासनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post